बासेल, 24 ऑगस्ट : दोनवेळा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये पदक मिळवणाऱ्या नेहवालचा यंदाचा प्रवास पूर्व उपांत्यफेरीत संपुष्टात आला. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या सायनाचा पूर्व उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टनं सायनाचा पराभव केला. एक तास 12 मिनिटे चालल्या या सामन्यात 15 -21, 27-25, 21-12 अशा तीन सेटमध्ये सायनाला पराभव स्विकारावा लागला. सायनानं जकार्तामध्ये झालेल्या 2015मध्ये रजत आणि ग्लास्गो येथे 2017मध्ये कांस्य पदक पटकावले. दरम्यान शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंचाच्या खराब निर्णयामुळं सानियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यावेळी कोर्टच्या बाहेर असलेला सानियाचा पती आणि भारतीय खेळाडू पारूपल्ली कश्यपनं ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. कश्यपनं, “पंचांच्या खराब निर्णयामुळं सायनाला दोन मॅच पॉईंट गमवावे लागले. ही धक्कादायक आहे की विश्व चॅम्पियनशीपमध्ये कोर्टमध्ये रिव्हुची सुविधा नाही. कधी सुधारणार खेळ?”, असा सवाल ट्विटवरून केला.
सायना झाली खराब अम्पायरिंगची शिकार सायना नेहवालचे विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात आले. मात्र, सायनानं यासाठी पंचांना कारणीभूत ठरवले आहे. सायनानं ट्वीट करत पंचांवर निशाना साधला. सायनाच्याआधी भारतीय खेळाडू आणि सायनाचे पती परूपल्ली कश्यप यानं, पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली. सायनानं, “पंचांच्या खराब निर्णयामुळं 2 मॅच पॉईंट मिळाले नाहीत. मला विश्वास बसत नाही आहे. दुसऱ्या गेममध्ये पंचांनी दोन वेळा मला पॉईंट दिले नाहीत, कदाचित खेळ पलटला असता”, असे ट्वीट केले आहे.
still can’t believe 2 match points which the umpire overruled in the second game . And the umpire tells me in the mid of second game “let the line umpires do their job” and I dnt understand suddenly how the umpire overruled the match points..very sick @bwfmedia @HSBCBWF https://t.co/1p4PP4yXzc
— Saina Nehwal (@NSaina) August 23, 2019
सिंधूची सेमीफायनलमध्ये एण्ट्री भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं World Badminton Championshipच्या सेमीफायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. पूर्व उपांत्य फेरीत तायवानच्या ताय त्जु यिंगला(Tai Tzu Zing)12-21, 23-21, 21-19ने नमवले. सध्या सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये जगक्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं 1 तास 11 मिनीटांपर्यंत लढत दिली. सलग तिसऱ्यांदा सिंधूनं सेमीफायनलमध्ये आपली जागा मिळवली. साई प्रणितनं मिळवले सेमीफायनलमध्ये स्थान भारतीय पुरुष संघाचा बॅडमिंटनपटू साई प्रणितनं वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यानं इंडोनेशियाच्या जॉनाटन क्रिस्टीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रणितनं क्रिस्टीला 24-22, 21-14नं मात दिली. हा सामना तब्बल 51 मिनिटांचा होता. यामुळं भारताचा 36 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. SPECIAL REPORT: प्लॅटफॉर्म ते स्टुडिओ…‘त्या’ एका VIDEOने बदललं आयुष्य