केपटाऊन, 18 फेब्रुवारी : आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताला इंग्लडविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला ५ बाद १४० धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या. भारताच्या रेणुका ठाकुरने १५ धावात ५ विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानतंर फलंदाजीत भारताच्या स्मृती मानधनाने अर्धशतक केलं. तिने ऋचा घोषच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र अखेरच्या षटकांमध्ये इंग्लंडने बाजी मारली. इंग्लंडने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची शफाली वर्मा लवकर बाद झाली. त्यानतंर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जलासुद्धा फारशी चमक दाखवता आली नाही. शफाली ८ तर जेमिमाह १८ धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार हमरनप्रीत कौरसुद्धा लवकर बाद झाली. स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. स्मृती मानधनाने अर्धशतक केलं. मात्र स्मृती मानधना बाद झाल्यानतंर दबावात भारताने विकेट गमावल्या. दिप्ती शर्मा चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाली. यानंतर ऋचा घोषणे फटकेबाजी केली मात्र विजय मिळवून देण्यासाठी ती अपुरी ठरली. हेही वाचा : चेंडू बॅट अन् पॅडला एकाच वेळी लागल्यास ICCचा नियम काय सांगतो? भारताच्या रेणुका ठाकुरने इंग्लंडला पहिल्याच षटकात दणका दिला. तिने डॅनी वॅटला झेलबाद केलं. त्यानतंर पुढच्या षटकातही तिने आणखी दोन विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. यामुळे इंग्लंडची अवस्था ३ बाद २९ अशी झाली होती. यानंतर इंग्लंडचा डाव स्किवर आणि हिथर नाइट यांनी सावरला. दोघींनी अर्धशतकी भागिदारी केली. हिथर नाइट बाद झाल्यानंतर स्किवरने एमी जोन्ससोबत ४० धावांची भागिदारी केली. अखेरच्या षटकात रेणुका ठाकुरने आणखी दोन विकेट घेतल्या. इंग्लंडने २० षटकात ७ बाद १५१ धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.