Women T20 World Cup : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी

Women T20 World Cup : 17 चेंडूत वसूल केल्या 76 धावा, महिला क्रिकेटपटूची तुफान फटकेबाजी

महिलांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने 66 चेंडूत शतक झळकावलं. यात तिनं 13 चौकार आणि 4 षटकार लगावले.

  • Share this:

कॅनबरा, 26 फेब्रुवारी : आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने थायलंडला 98 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटच्या तडाखेबाज फलंदाजीसमोर थायलंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली. आघाडीचे फलंदाज 7 धावांत बाद झाल्यानंतर हीदरने 66 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 108 धावा केल्या. तिच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकात 176 धावा केल्या. त्यानंतर थायलंडचा संघ 78 धावाच करू शकला.

नाणेफेक जिंकल्यानंतर थायलंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर अॅमी जोन्स खातंही न उघडता बाद झाली. संघाच्या 7 धावा झाल्या असताना डेनिएला वेट बाद झाली. संघाची अवस्था 2 बाद 7 अशी असताना नतेली सिवर आणि हीदर नाइट या दोघींनी फटकेबाजी करत 176 धावा केल्या.

सिवरने 52 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तर नाइटने 108 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून शतक करणारी ती तिसरी महिला फलंदाज आहे. तिच्याआधी तमसिन ब्योमॉन्ट आणि डॅनिएल वॅटने टी20 मध्ये शतक झळकावलं आहे. आतापर्यंत 14 महिला क्रिकेटपटूंनी टी20 मध्ये शतकी खेळी केली आहे.

इंग्लंडने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना थायलंडला 20 षटकांत 7 बाद 78 धावांपर्यंत मजल मारता आली. थायलंडकडून नत्तान चँटमने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर कोंचारकोंकईने 12 आणि चेईवेईने नाबाद 19 धावा केल्या. इंग्लंडकडून अॅनी श्रबसोलने 3 तर सिवरने दोन विकेट घेतल्या.

वाचा : कोट्यावधींना विकत घेतलेले ‘हे’ 5 स्टार विदेशी खेळाडू खेळणार नाहीत IPL

First published: February 26, 2020, 3:15 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या