मुंबई, 16 फेब्रुवारी : भारतीय महिला क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा सामना जिंकला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू क्रिकेटर दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यामुळे वेस्ट इंडिजला 118 धावांवर रोखता आलं. वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिप्ती तिच्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखली जाते. तिने वेस्ट इंडिजविरुद्ध महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तिने 3 विकेट घेताना मोठा विक्रमही केला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिने अशी कामगिरी केलीय जी भारतीय पुरुष संघाचे स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनाही करता आलेली नाही. हेही वाचा : IND VS WI : भारताकडून वेस्ट इंडिजची धुलाई, उपांत्य फेरीकडे यशस्वी वाटचाल दिप्ती शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 88 सामने खेळले आहेत. यात तिने 100 विकेट घेण्याची कामगिरी केलीय. वेस्ट इंडिंजविरुद्ध ३ विकेट घेत पूनम यादवला मागे टाकलं. तर पुरुष क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारने 87 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत तर दुसऱ्या स्थानी असलेल्या चहलने 87 विकेट घेतल्या आहेत. टी20 वर्ल्डकपमधील भारताच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 118 धावा केल्या होत्या. 119 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋचा घोष आणि हरमनप्रीत यांनी अर्धशतकी भागिदारी केली. तर ऋचा घोषने 44 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तिने फटकेबाजी केली होती. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 6 विकेटने जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.