जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Womens T20 WC : ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा षटकार, दक्षिण आफ्रिकेचा पराभव

Womens T20 WC : ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा षटकार, दक्षिण आफ्रिकेचा पराभव

australia women

australia women

महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा षटकार लगावला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी पराभूत केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

केपटाऊन, 26 फेब्रुवारी : महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा षटकार लगावला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डटच्या अर्धशतकी खेळी केली. मात्र तिची झुंज अपुरी ठरली. आफ्रिकेला १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने ५३ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. याशिवाय एश्ले गार्डनरने २१ चेंडूत २९ धावा केल्या. एलिसा हिली १८ तर मेग लॅनिंग १० धावांवर बाद झाल्या. ऑस्ट्रेलियाने हिली बाद झाल्यानंतर एश्ले गार्डनर आणि ग्रेस हॅरीस यांना बढती दिली होती. ग्रेस हॅरीस फारशी कमाल करू शकली नाही. ती १० धावा करून बाद झाली. एलिस पेरी ७ तर वॅरेहम शून्यावर बाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माइल आणि कॅपने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर मलाबा आणि ट्रायनने प्रत्येकी एक विकेट घेतली. VIDEO : एका ओव्हरमध्ये हव्या होत्या 4 धावा, पण 6 चेंडूत 5 बॅटर आऊट   ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अडखळत झाली. ब्रिट्स फक्त १० धावांवर बाद झाली. त्यानतंर कॅप ११ तर सुन लुस २ धावांवर बाद झाली. यानंतर क्लो ट्रायन आणि लॉरा वोल्वार्डटने अर्धशतकी भागिदारी केली. मात्र लॉरा वोल्वार्डट बाद झाल्यानतंर दक्षिण आफ्रिकेच्या आशा संपुष्टात आल्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात