मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विस्डनने जाहीर केली ऑल टाईम टी-20 वर्ल्ड कप टीम, दोन भारतीयांना स्थान

विस्डनने जाहीर केली ऑल टाईम टी-20 वर्ल्ड कप टीम, दोन भारतीयांना स्थान

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचं (ICC T-20 World Cup) यंदा भारतात आयोजन होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. विस्डनने आतापर्यंत झालेल्या सगळ्या टी-20 वर्ल्ड कपच्या टीमची (Wisden all time T-20 World Cup Team) घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 मार्च : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचं (ICC T-20 World Cup) यंदा भारतात आयोजन होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी सगळ्या टीम त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी देणार आहेत. 2007 पासून आतापर्यंत 6 टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आले. यातला पहिला वर्ल्ड कप भारताने जिंकला, तर पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेला एकदा तसंच वेस्ट इंडिजला दोनदा या ट्रॉफीवर कब्जा करण्यात आला. विस्डनने आतापर्यंत झालेल्या सगळ्या टी-20 वर्ल्ड कपच्या टीमची (Wisden all time T-20 World Cup Team) घोषणा केली आहे.

विस्डनच्या या यादीमध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली या दोन भारतीयांना स्थान देण्यात आलं आहे. भारताला 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या धोनीला या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर पाकिस्तानच्या तब्बल तीन खेळाडूंची या टीममध्ये निवड करण्यात आली आहे. शाहिद आफ्रिदी, उमर गुल आणि सईद अजमल या तिघांना ऑल टाईम टीममध्ये निवडण्यात आलं आहे.

विस्डनच्या या टीममध्ये ओपनर म्हणून वेस्ट इंडिजचा क्रिस गेल आणि श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा केव्हिन पीटरसन आहे. पाचव्या क्रमांकावर मार्लोन सॅम्युअल्सला आणि सहाव्या क्रमांकावर माईक हसीला ठेवण्यात आलं आहे. धोनी टीमचा कर्णधार, विकेट कीपर आणि सातव्या क्रमांकावर खेळणारा आहे.

धोनीनंतर आठव्या क्रमांकावर ऑल राऊंडर शाहिद आफ्रिदीला निवडण्यात आलं आहे. तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी लसिथ मलिंगा, उमर गुल या दोघांवर आणि स्पिनर म्हणून सईद अजमलला स्थान देण्यात आलं आहे.

विस्डन ऑल टाईम टी-20 वर्ल्ड कप टीम

क्रिस गेल, महेला जयवर्धने, विराट कोहली, केव्हिन पीटरसन, मार्लोन सॅम्युअल्स, माईक हसी, एमएस धोनी (कर्णधार), शाहिद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, उमर गुल, सईद अजमल

First published:

Tags: MS Dhoni, T20 cricket, Virat kohli