लंडन, 11 जुलै : नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) विम्बल्डन फायनलमध्ये (Wimbledon 2021 Final) मॅटो बेरेटिनी याचा 6-7 (4/7), 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला आहे. पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविचने पुढचे लागोपाठ तीन सेट जिंकत आणखी एक ग्रॅण्डस्लॅम खिशात टाकलं. जोकोविचचनं हे सहावा विम्बल्डन किताब तर एकूण 20 वा ग्रॅण्डस्लॅम विजय आहे. याचसोबत त्याने रॉजर फेडरर आणि राफेल नडाल यांच्या सर्वाधिक 20 ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक जोकोविचने याआधी फ्रेन्च ओपनमध्येही विजय मिळवला होता. सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम विजय 20 : रॉजर फेडरर (6 ऑस्ट्रेलियन, 1 फ्रेंच, 8 विम्बल्डन, 5 यूएस ओपन) 20: राफेल नडाल (1 ऑस्ट्रेलियन, 13 फ्रेंच, 2 विम्बल्डन, 4 यूएस ओपन) 20: नोवाक जोकोविच (9 ऑस्ट्रेलियन, 2 फ्रेंच, 6 विम्बल्डन, 3 यूएस ओपन) 14: पीट संप्रास (2 ऑस्ट्रेलियन, 7 विम्बल्डन, 5 यूएस ओपन) 12: रॉय इमर्सन (6 ऑस्ट्रेलियन, 2 फ्रेंच, 2 विम्बल्डन, 2 यूएस ओपन) 11: रॉड लेव्हर (3 ऑस्ट्रेलियन, 2 फ्रेंच, 4 विम्बल्डन, 2 यूएस ओपन) 11: बीजोर्न बोर्ग (6 फ्रेंच, 5 विम्बल्डन) 10: बिल टिल्डेन (3 विम्बल्डन, 7 यूएस ओपन)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.