मुंबई, 11 जुलै : ऑस्ट्रेलियाची टेनिसपटू एश्ले बार्टीनं (Ashleigh Barty) पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धेचं (Wimbledon 2021) विजेतेपद पटकावले आहे. महिला एकेरीच्या फायनलमध्ये तिने चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाचा 6-3, 6-7, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी तिने 2019 साली फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. (फोटो: Ash Barty instagram)
बार्टी 143 वर्षांनंतर विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली क्रिकेटर बनली आहे. ती विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी एकूण तिसरी क्रिकेटर आहे. (फोटो: Ash Barty instagram)
सध्या नंबर 1 वर असलेल्या बार्टीच्या आधी पुरुष एकेरीत दोन जणांनी विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. स्पेंसर गोरे याने 1877 तर फ्रेंक हाडो यांनी 1878 साली ही स्पर्धा जिंकली आहे. या दोघांनीही फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहे. (फोटो : AP)
या दोघांनंतर बार्टी विम्बल्डन जिंकणारी पहिली क्रिकेटर बनली आहे. बार्टीनं 2015-16 च्या सिझनमध्ये टी20 बिग बॅश लीग स्पर्धेत ब्रिस्बेन हिट टीमचं प्रतिनिधित्व केले होते. (फोटो : AFP)
बार्टीनं 2014 साली टेनिसमधून ब्रेक घेत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तिला कोणतेही क्रिकेटचे प्रशिक्षण नसताना बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट टीमनं करारबद्ध केले होते. त्यानंतर 2016 साली तिने टेनिसमध्ये पुनरागमन केले. (Instagram)
बार्टीनं पुनरागमनानंतर एक वर्षांनी पहिली WTA स्पर्धा जिंकली. 2018 साली अमेरिकन ओपन्स स्पर्धेचे दुहेरी गटात अजिंक्यपद पटकावले. 2019 साली फ्रेंच ओपन स्पर्धेत एकेरी गटात विजेतेपद पटकावले. त्यानंतर ती आता विम्बल्डनची राणी बनली आहे.