लंडन, 13 जुलै: स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) याने सेमीफायनल सामन्यात स्पेनच्या दिग्गज टेनिसपटू राफेल नडाल (Rafael Nadal) याचा पराभव करत विम्बल्डनच्या (Wimbledon) अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोन्ही आघाडीच्या टेनिसपटूंमध्ये शेवटच्या सेटमध्ये एक-एक गुणासाठी जोरदार मुकाबला झाला. या विजयासह फेडररने १२व्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अंतिम लढतील त्याचा मुकाबला जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकव्हिच याच्याशी होणार आहे.
सेमीफायनलमध्ये फेडरर आमि नडाल यांच्यात जोरदार टक्कर पहायला मिळाली. पहिल्याच सेटमध्ये हा सामना चुरशीचा होईल याची जाणीव झाली. 51 मिनिटे चाललेला पहिला सेट टाय ब्रेकरपर्यंत पोहोचला. अखेर फेडररने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये नडालने शानदार कमबॅक केले. नडालने दुसऱ्या सेटमध्ये 6-1 असा विजय मिळवला. या सेटमध्ये फेडररने 11 वेळा चुका केल्या. तिसऱ्या सेटमध्ये फेडररने पुन्हा एकदा विजय मिळवला. चौथ्या सेटमध्ये 5-3अशी आघाडी घेतलेल्या फेडररला शेवटचा गुण मिळवण्यास झगडावे लागले. दोघांच्यात शेवटच्या गुणासाठी पाच वेळा ड्यूस झाला. अखेर फेडररने चौथा 6-4ने जिंकला आणि फायनलमध्ये स्थान मिळवले. फेडररने नडालचा 7-6 (3), 1-6, 6-3, 6-4 असा पराभव करत 12व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला.
Roger Federer defeats Rafael Nadal in four sets to book #Wimbledon final clash against Novak Djokovic. (file pic) pic.twitter.com/YARL5EURsc
— ANI (@ANI) July 12, 2019
दुसऱ्या एका सेमीफायनलमध्ये जोकोव्हिचने रॉबर्टो बातिस्ता आगुटा याचा 6-2, 4-6, 6-3, 6-2 असा पराभव करत सहव्यांदा अंतिम फेरी गाठली. जोकोव्हीचने 25व्यांदा ग्रॅडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने आतापर्यंत 15 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.
ग्रास कोर्टचा राजा असलेल्या फेडररने वयाच्या 37 वर्षी प्रथम जपानच्या केई निशिकोरीचा 4-6, 6-1, 6-4, 6-4 असा नंतर बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा 6-4, 6-0, 6-2 ने पराभव करत सेमीफायनमध्ये स्थान पक्क केले होते. विम्बल्डनमध्ये फेडररचा हा 13वा तर नडालचा 9वा सेमीफायनलमधील सामना होता.
ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?