मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /RR vs GT:गुजरातकडून पदार्पणाची संधी मिळणारा Yash Dayal आहे तरी कोण?

RR vs GT:गुजरातकडून पदार्पणाची संधी मिळणारा Yash Dayal आहे तरी कोण?

आयपीएल 2022(IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने आहेत. दरम्यान, दोन्ही संघात बदल दिसत आहेत. तर गुजरातकडून एका नव्या खेळाडूने पदार्पण केलं आहे.

आयपीएल 2022(IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने आहेत. दरम्यान, दोन्ही संघात बदल दिसत आहेत. तर गुजरातकडून एका नव्या खेळाडूने पदार्पण केलं आहे.

आयपीएल 2022(IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने आहेत. दरम्यान, दोन्ही संघात बदल दिसत आहेत. तर गुजरातकडून एका नव्या खेळाडूने पदार्पण केलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 एप्रिल: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोन्ही संघात बदल दिसत आहेत. तर गुजरातकडून एका नव्या खेळाडूने पदार्पण केलं आहे.

गुजरातने यश दयाल(Yash Dayal) याला पदार्पणाची संधी दिली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा राहणारा 24 वर्षीय यशही आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. यश हा वेगवान गोलंदाज असून त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याला गुजरातने त्याच्या मूळ किमतीच्या १६ पटीने मेगा लिलावात सामील करून घेतले.

कोण आहे यश दयाल?

यश दयाल हा 24 वर्षीय खेळाडू असून उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तसेच तो देशांतर्गत क्रिकेट देखील उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो. त्याला आयपीएल 2022 लिलावात गुजरात टायटन्स संघाने 3.2  कोटी रुपये मोजत आपल्या संघात सामील करून घेतले. त्यामुळे आता तो आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसेल. त्याच्यासाठी आयपीएल लिलावात अनेक संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती. पण अखेर गुजराजने बाजी मारली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद येथे पार पडलेल्या वनडे मालिकेदरम्यान यश भारताचा नेट गोलंदाज होता. त्यामुळे तो भारतीय संघासह बायोबबलमध्येही होता. त्याच्याकडे 140 प्रती किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तसेच डावखरी गोलंदाज असलेल्या यशकडे चेंडूला स्विंग करण्याचीही कला अवगत आहे.

हे ही वाचा-धोनी किंवा रोहितनं नाही तर 18 वर्षांच्या मुलानं लगावलाय सर्वात लांब SIX

यशने यापूर्वी काही आयपीएल संघांसाठी ट्रायलही दिली होती. त्याने मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स अशा संघांसाठी यापूर्वी ट्रायल दिली आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी 2021-22 स्पर्धेत 14 विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पहिल्या 5 जणांमध्ये होता.

त्याने छत्तीसगढ़विरुद्ध 2018  मध्ये अ दर्जाच्या सामन्यातून वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला 2018सालीच गोवा संघाविरुद्ध अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळले असून135 धावा केल्या आहेत. तसेच 45 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 14 अ दर्जाचे सामने खेळले असून 23विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कारकिर्दीत15  टी20 सामने देखील खेळले आहेत. यात त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत.

First published:

Tags: Gujrat, IPL 2021