जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shane Warne Death : मृत्यूआधी शेन वॉर्नने कोणाची भेट घेतली होती? पाच दिवसांनंतर झाला खुलासा

Shane Warne Death : मृत्यूआधी शेन वॉर्नने कोणाची भेट घेतली होती? पाच दिवसांनंतर झाला खुलासा

Shane Warne Death : मृत्यूआधी शेन वॉर्नने कोणाची भेट घेतली होती? पाच दिवसांनंतर झाला खुलासा

ऑस्ट्रेलियाचा महान स्पिन बॉलर शेन वॉर्न (Shane Warne) याने गेल्या शुक्रवारी (4 मार्च 2022) थायलंडमधील (Thailand) त्याच्या व्हिलामध्ये अखेरचा श्वास घेतला. हार्टअ‍ॅटक (Heart Attack) आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

    मुंबई, 9 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिन बॉलर शेन वॉर्न (Shane Warne) याने गेल्या शुक्रवारी (4 मार्च 2022) थायलंडमधील (Thailand) त्याच्या व्हिलामध्ये अखेरचा श्वास घेतला. हार्टअ‍ॅटक (Heart Attack) आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. शेन वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमनं एक संक्षिप्त स्टेटमेंट रिलीज करून त्याचं निधन (Shane Warne dEATH) झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. या स्टेटमेंटनुसार ‘शेन त्याच्या थायलंडमधील व्हिलामध्ये अनरिस्पॉन्सिव्ह कंडिशनमध्ये (Unresponsive Condition) आढळला होता. प्राथमिक तपासात पोलिसांनादेखील काहीच संशयास्पद (Suspicious) आढळलं नव्हतं. मात्र, आता शेन वॉर्नच्या शेवटच्या क्षणांबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता शेन वॉर्नशी संबंधित एका व्यक्तीबाबत काही माहिती समोर आली आहे. परशुराम पांडे, असं या व्यक्तीचं नाव आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी त्याला भेटलेल्या मोजक्या लोकांमध्ये 44 वर्षीय परशुराम पांडे (Parashuram Pandey) यांचाही समावेश होता. शेन वॉर्न थायलंडमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये राहत होता त्याच रिसॉर्टजवळ परशुराम पांडे टेलरिंगचं दुकान (Tailoring Shop) चालवतात. शेन वॉर्नचा मृत्यू झाला त्यापूर्वी चार तास तो परशुराम पांडे यांना भेटला होता. 4 मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेन वॉर्न, पांडेंच्या ‘ब्रिओनी टेलर्स’ (Brioni Tailors) या दुकानात गेला होता. परशुराम पांडे यांनी डेलीमेलला सांगितलं की, त्या दिवशी शेन वॉर्न आला तेव्हा तो खूप आनंदी होता. कारण, तो खूप दिवसांनी थायलंडला आला होता. दुकानात पोहोचताच त्यानं परशुराम पांडेंना मिठीही मारली होती. त्यानंतर अवघ्या चार तासांनी शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकायला आली. पांडे आणि शेन वॉर्न यांची 2019 मध्ये ओळख झाली होती. वॉर्ननं त्यांच्या शॉपमधून 10 सूट खरेदी केले होते. तो एकदा त्यांच्या घरीही गेला होता. परशुराम पांडे म्हणतात की, ‘वॉर्न एक अतिशय चांगला ग्राहक होता. मी देखील त्याचा मोठा चाहता होतो. शेन वॉर्नच्या ज्या मित्रांसोबत थायलंडमध्ये आला होता. त्यांच्यापैकी एकानं माझ्या शॉपमध्ये सूट बुक केले होते.’ शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनानं परशुराम पांडेंनाही धक्का बसला आहे. थायलंड पोलिसांनी (Thailand Police) दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न आपल्या मित्रांसह थायलंडला आला होता. शुक्रवारी दुपारी ते सर्वजण विश्रांती घेत होते. बराचवेळ झाल्यानं शेनच्या चार मित्रांपैकी एकानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं प्रतिसाद दिला नाही. मेडिकल सपोर्ट मिळण्यापूर्वी त्याच्या मित्रांनी सुमारे 20 मिनिटं त्याला सीपीआर (CPR) देऊन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला थाई इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये (Thai International Hospital) नेण्यात आलं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या मृत्यूमध्ये काहीही संशयास्पद नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानंच झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही समोर आलं आहे. लवकरच त्याचं पार्थिव ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाणार आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र, टॉम हॉलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. हा वॉर्नचा थायलंडमधील शेवटचा फोटो होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात