मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /11व्या वर्षी बापाचं छत्र हरवलं, आई-भावाने कपडे शिवले.. पोरानं घडवला इतिहास, CWG सुवर्णपदक विजेता अचिंताचा संघर्ष

11व्या वर्षी बापाचं छत्र हरवलं, आई-भावाने कपडे शिवले.. पोरानं घडवला इतिहास, CWG सुवर्णपदक विजेता अचिंताचा संघर्ष

Who is Achinta Sheuli: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्णपदके मिळाली असून तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. तिसरे पदक बंगालच्या अचिंता शेउलीने पटकावले. वेटलिफ्टर होण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. 2013 मध्ये वडील गमावले. यानंतर मोठ्या भावाने वेटलिफ्टिंग सोडून नोकरी धरली. जेणेकरून वेटलिफ्टर होण्याचे अचिंताचे स्वप्न भंग होऊ नये. आईने कपडेही शिवले.

Who is Achinta Sheuli: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्णपदके मिळाली असून तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. तिसरे पदक बंगालच्या अचिंता शेउलीने पटकावले. वेटलिफ्टर होण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. 2013 मध्ये वडील गमावले. यानंतर मोठ्या भावाने वेटलिफ्टिंग सोडून नोकरी धरली. जेणेकरून वेटलिफ्टर होण्याचे अचिंताचे स्वप्न भंग होऊ नये. आईने कपडेही शिवले.

Who is Achinta Sheuli: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्णपदके मिळाली असून तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. तिसरे पदक बंगालच्या अचिंता शेउलीने पटकावले. वेटलिफ्टर होण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. 2013 मध्ये वडील गमावले. यानंतर मोठ्या भावाने वेटलिफ्टिंग सोडून नोकरी धरली. जेणेकरून वेटलिफ्टर होण्याचे अचिंताचे स्वप्न भंग होऊ नये. आईने कपडेही शिवले.

पुढे वाचा ...

CWG: 11व्या वर्षी बापाचं छत्र हरवलं, आई-भावाने कपडे शिवले.. पोरानं घडवला इतिहास

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : जंगली झुडपं आणि उंच झाडांच्या मधोमध पडझड झालेली रचना, ज्याला घरही म्हणता येत नाही. जवळच्या भिंतीवर मोठा तिरंगा. आजूबाजूला विखुरलेल्या धातूच्या पाट्या. कोणाला सांगितलं तर विश्वास ठेवणार नाही की अशा ठिकाणाहून चॅम्पियन देखील बाहेर येऊ शकतात. पण कोलकात्यापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या दुलपूरमधलं हे तेच घर आहे, जिथून ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची पदक विजेती आणि राष्ट्रीय विक्रमाची मानकरी अचिंता शिउलीनं आपला प्रवास सुरू केला होता. अचिंता शेउलीने रविवारी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

अंचिताच्या या यशाने केवळ तिचे कुटुंबीयच खूश नाहीत, तर तिचे बालपणीचे प्रशिक्षक अस्तम दासही भावूक झालेत. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, "जेव्हा मी अचिंताला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो खूप सडपातळ होता, तो अजिबात वेटलिफ्टर दिसत नव्हता. पण त्याच्याकडे वेग होता जो कोणत्याही खेळातील खेळाडूसाठी खूप महत्त्वाचा असतो."

मोठ्या भावाला पाहून अचिंत वेटलिफ्टिंगमध्ये

अचिंताच्या आधी त्याचा मोठा भाऊ आलोक याने वेटलिफ्टिंगला प्रवेश घेतला होता. त्याने एकदा बॉडी बिल्डिंग स्पर्धा पाहिली आणि त्यानंतर त्याची खेळाची आवड इतकी वाढली की तो थेट त्याच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या कोच अस्तम दास यांच्या जिममध्ये गेला. काही वर्षांनी अचिंताही त्या जिममध्ये जाऊ लागला.

11 वर्षांचा असताना बापाचं छत्र हरवलं

आलोकने सांगितले की, 2013 मध्ये आमच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा आम्ही नॅशनलची तयारी करत होतो. वडिलांच्या निधनानंतर आमची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा हा प्रकार घडला आणि अचानक कुटुंबाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली, त्यामुळे मला वेटलिफ्टिंग सोडावी लागली, पण अचिंताने खेळ सुरूच ठेवला आणि त्यात प्रशिक्षक अस्तम दास यांची महत्त्वाची भूमिका आहे.

IND-W vs PAK-W: स्मृती मंधना आता रोहित-विराटच्या क्लबमध्ये! तर हरमनप्रीतने धोनीला टाकले मागे

प्रशिक्षकाने प्रशिक्षणासोबतच डाएटची पूर्ण काळजी घेतली

अस्तम दास या माजी राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टरचा संदर्भ देत आलोक म्हणतात, “अस्तम यांनीच मला आणि अचिंताला त्याच्या देखरेखीखाली तयार करण्याचे काम केले आहे. ते आम्हाला मोफत प्रशिक्षण द्यायचे. ते वेटलिफ्टिंगमध्ये इतके समर्पित होते की त्यांनी त्यासाठी बीएसएफची नोकरीही सोडली.

अचिंता पूर्वी सडपातळ आणि कमी वजनाचा होता

अस्तम सांगतात की, जेव्हा अचिंता पहिल्यांदा त्यांच्याकडे आला तेव्हा तो खूप सडपातळ आणि कमी वजनाचा होता. पण, एक गोष्ट होती ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरला, तो म्हणजे वेटलिफ्टिंगमध्ये चांगली कामगिरी करण्याची भूक. त्याने सहजासहजी हार मानली नाही. माझ्याकडे त्याच्यापेक्षा चांगले वेटलिफ्टर्स होते. पण, शिउली त्याच्या कधीही न हार न मानण्याच्या वृत्तीमुळे शीर्षस्थानी पोहोचला. प्रशिक्षकाने त्याला केवळ प्रशिक्षणच दिले नाही, तर त्याच्या आहाराचीही काळजी घेतली.

अचिंताची वेटलिफ्टिंग कारकीर्द कशी बदलली?

वडिलांच्या मृत्यूनंतर, अचिंताने 2013 मध्ये ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केला होता, तो चौथ्या स्थानावर होता. पण आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षकाचे त्याने लक्ष वेधलं. पुढच्या वर्षी त्याने सैन्यासाठी चाचण्या दिल्या आणि बंगालमधून निवड झालेला तो एकमेव वेटलिफ्टर ठरला. येथून त्याने व्यावसायिक वेटलिफ्टर बनण्यास सुरुवात केली.

सैन्यात दाखल झाल्यानंतर करिअर बदलले

अचिंताचा मोठा भाऊ आलोक सांगतो, '2014 मध्ये त्याची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटसाठी निवड झाली होती. यानंतर त्याने युवा राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला. त्याने तिसरा क्रमांक पटकावला. पुढच्या वर्षी तो सैन्यात दाखल झाला. त्याच वर्षी त्याला प्रथमच भारतीय शिबिराचे निमंत्रण मिळाले. येथूनच त्याच्या चमकदार कारकिर्दीला सुरुवात झाली. त्याने ज्युनियर वर्ल्ड, एशियन चॅम्पियनशिप आणि नंतर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास रचला.

अचिंताला वेटलिफ्टर बनवण्यात आई आणि भावाचा मोठा वाटा

वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ आलोक आणि आईने अचिंताला वेटलिफ्टर बनवण्यासाठी रात्रंदिवस एक केले. आईने कपडे शिवले. या कामात मोठ्या भावानेही त्यांना मदत केली. लोडिंग कंपनीत काम केले, जेणेकरून अचिंताला पैशाची अडचण येऊ नये आणि तो त्याच्या प्रशिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल. अचिंताचा मोठा भाऊ सध्या अग्निशमन दलात कंत्राटी कर्मचारी असून, वेटलिफ्टिंगमध्ये मोठा ठसा उमटवण्याचे त्याचे स्वप्न आजही कायम आहे. पण, आता तो आपल्या भावाच्या माध्यमातून आपले स्वप्न जगत आहे.

First published:

Tags: Weight lifting