मुंबई, 20 नोव्हेंबर : भारतात क्रिकेट आणि सिनेमा दोन्ही लोकप्रिय आहेत. अनेक स्टार क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. अशातच बॉलिवूडची ब्युटी क्वीन उर्वशी रौतेला अनेकदा क्रिकेटर ऋषभ पंतसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. दोघांनाही एकमेकांच्या नावाने अनेकदा डिवचलं जातं. दोघेही अनेकदा एकमेकांविषयी अप्रत्यक्षरित्या बोलतात. त्यामुळे उर्वशी आणि ऋषभमध्ये नक्की काय चाललंय? असा प्रश्न नेटकऱ्यांना कायम पडतो. अशातच उर्वशी आणि ऋषभमध्ये नक्की काय नातेसंबंध आहे याविषयी क्रिकेटर शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे. प्रीती आणि नीती सिमोज यांचा लोकप्रिय पंजाबी चॅट शो ‘दिल दिया गल्ला’ मध्ये शुभमन गिलने नुकतीच हजेरी लावली होती. हा शो सोनम बाजवा होस्ट करत आहे. या शोमध्ये शुभमनला ऋषभ पंतविषयी प्रश्न विचारला जातो. आजकाल ऋषभ पंतला अभिनेत्रीच्या नावाने खूप चिडवले जाते. संघातही त्याची अशीच छेड काढली जाते का? यावर शुभमन म्हणतो, नाही त्याला अजिबात काही देणेघेणे नाही, कारण त्याला माहित आहे की आपलं आणि त्याचं काहीच नाही. खरंतर अभिनेत्रीलाच कोणीतरी तिची छेट काढावी असे वाटते. शुभमनच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांनी कधीकाळी एकमेकांना डेट केले होते. मात्र, आता दोघांमध्ये बरेच अंतर आले आहे. ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला एकमेकांना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. दोघांमधील मतभेद सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.
दरम्यान, उर्वशी रौतेलाच्या मुलाखतीनंतरच दोघांमधील शीतयुद्ध सुरू झाल्याचे मानले जात आहे. ऋषभ पंतकडे बोट दाखवत उर्वशीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा एका व्यक्तीने हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास त्याची वाट पाहिली होती. उर्वशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, क्रिकेटर ऋषभ पंतने तिची खिल्ली उडवत एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. ऋषभ पंतने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता लिहिले होते, बहिण माझा पाठलाग करणं सोड. इन्स्टा स्टोरी पोस्ट केल्यानंतर काही वेळातच ऋषभने ती डिलीटही केली. मात्र दोघांमधील दुरावा अजूनही कायम आहे.