मुंबई, 10 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी फार अवघड ठरला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 480 धावांचा डोंगर उभा केला. तर हे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवसाअंती 36 धावा केल्या. परंतु याच दरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 कॅच पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. अहमदाबादमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाज नॅथन लियॉनचा झेल घेतला. या कॅच सह विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 कॅच घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
11 टॅटूच्या 11 स्टोरी, फक्त फॅशन म्हणून नाही तर… विराटच्या प्रत्येक Tattoo ला आहे खास कारण भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 334 कॅच घेतले आहेत. तर त्याखालोखाल माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत 261 झेल घेतले आहेत.