जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli Reply Babar Azam: बाबरच्या ट्विटवर विराटची पहिली प्रतिक्रिया, किंग कोहली म्हणाला...

Virat Kohli Reply Babar Azam: बाबरच्या ट्विटवर विराटची पहिली प्रतिक्रिया, किंग कोहली म्हणाला...

Virat Kohli Reply Babar Azam: बाबरच्या ट्विटवर विराटची पहिली प्रतिक्रिया, किंग कोहली म्हणाला...

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. एकीकडे विराटचं टीममधलं स्थान धोक्यात आलेलं असतानाच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) विराटच्या समर्थनासाठी ट्विट केलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. विराट कोहलीचं नाव ऐकलं तरी दिग्गज बॉलर घाबरायचे, पण आता नव्या युवा बॉलरसमोरही विराटला एक-एक रन काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोहलीच्या या सततच्या फ्लॉप शोमुळे त्याला टी-20 टीममधून बाहेर ठेवावं, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. एकीकडे विराटचं टीममधलं स्थान धोक्यात आलेलं असतानाच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) विराटच्या समर्थनासाठी ट्विट केलं होतं. ही खराब वेळही निघून जाईल, खंबीर राहा, असं ट्वीट बाबरने केलं. याचसोबत त्याने विराटसोबतचा एक फोटोही शेअर केला. बाबर आझमच्या या ट्वीटवर विराट कोहलीने रिप्लाय दिला आहे. धन्यवाद, चमकत राहा आणि पुढे जात राहा, तुला यश मिळत राहो, असं विराट म्हणाला. सोबतच विराटने नमस्काराची स्माईलीही टाकली आहे.

जाहिरात

इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट 1 टेस्ट, 2 टी-20 आणि एक वनडे खेळला आहे. या 5 इनिंगमध्ये त्याला एकदाही 20 रनपेक्षा जास्त स्कोअर करता आलेला नाही. इंग्लंड दौऱ्यात विराटने आतापर्यंत 59 रन केले आहेत. इंग्लंड दौऱ्यात सुरू असलेल्या वनडे सीरिजमध्ये विराट खेळत आहे, पण दुखापतीमुळे तो पहिला सामना खेळू शकला नव्हता. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटने 25 बॉलमध्ये 16 रन केले. डेव्हिड विलीने विराटला आऊट केलं. मागच्या अडीच वर्षांपासून विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅट मिळून 77 इनिंगमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. मागच्या अडीच वर्षात विराटने एकही शतक केलेलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 71 शतकं आहेत. विराटच्या या खराब फॉर्ममुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्याऐवजी युवा खेळाडूंना संधी द्यावी, अशी मागणीही सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 462 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत, यातल्या 516 इनिंगमध्ये त्याने 23,709 रन केले आहेत. कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं आणि 122 अर्धशतकं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात