मुंबई, 17 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा चांगल्या फॉर्मात दिसत आहे. भारतीय संघाची ही रन मशीन सध्या सुसाट धावत असून अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड देखील मोडत आहे. श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने दोन शतके झळकावली. ही शतक विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 आणि 74 वी शतक ठरली. विराटचे चाहते विराटसाठी कोणत्याही थराला जातात. अशातच यावर्षी विराटच्या चाहत्याची इच्छा पूर्ण झाली असून तो विराटच्या 74 व्या शतकादिवशी लग्नबंधनात अडकला.
विराट कोहलीच्या या चाहत्याचे नाव अमन अग्रवाल असे आहे. हा तोच चाहता आहे जो 10 एप्रिल 2022 रोजी आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये पोस्टर घेऊन आला होता. ज्या पोस्टरमध्ये लिहिले होते की, "जोपर्यंत विराट त्याचे 71 वे शतक पूर्ण करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही". अखेर गेल्यावर्षी विराटने 71 वे शतक ठोकून अमन सारख्या अनेक चाहत्यांची इच्छा पूर्ण केली.
हे ही वाचा : भीषण अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच सोशल मीडियावर; प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट
जेवढे विराटचे चाहते त्याच्यावर प्रेम करतात, तेवढेच विराट देखील आपल्या चाहत्यांवर प्रेम करतो. 15 जानेवारी 2023 रोजी विराटचा चाहता अमन अग्रवाल हा लग्नबंधनात अडकला. त्याच दिवशी विराटने श्रीलंके विरुद्ध तिसऱ्या सामन्यात दमदार खेळी करत आपले 74 वे शतक पूर्ण केले. हा दिवस विराटच्या चाहत्यासाठी दुग्धशर्करा योग्य ठरला. विराट कोहलीने त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याचे 74 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले.
"I asked for the 71st century but he scored 74th on my special day" ❤️❤️❤️@imVkohli @AnushkaSharma @StayWrogn pic.twitter.com/zHopZmzKdH
— Aman Agarwal (@Aman2010Aman) January 16, 2023
अमनने विराटच्या शतकानंतर ट्विटरवर एक फोटो शेअर केला. ज्यात एका फोटोमध्ये 2022 चा पोस्टर बरोबरचा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो शेरवानी परिधान करून टीव्ही स्क्रीनसमोर उभा राहून विराटचे 74 वे शतक साजरा करताना दिसतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India Vs Sri lanka, Virat kohli