मुंबई, 02 मे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीमुळं ओळखला जातो. मात्र हाच कोहली मैदानाबाहेरही तेवढचा चर्चेत असतो. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर नवनवे रोकॉर्डस प्रस्थापित करत असतो, त्याचप्रमाणे विराट सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे करोडोंमध्ये चाहते आहेत. यामुळंच अनेक दिग्गजांना मागे टाकत कोहलीनं एक पुरस्कार पटकावला आहे.
गुरुवारी मुंबईमध्ये इन्स्टाग्राम ऑफ द ईयर 2019या पुरस्कारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. यात विराटला मोस्ट एंगेज्ड अकाऊंटचा पुरस्कार मिळाला आहे. तर, 39 कोटी फॉलोअर्स असलेल्या प्रियांका चोप्राला मोस्ट फॉलोवड अकाऊंटचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय विनोदी व्हिडिओकरिता भुवन बाम याला इंटरटेनमेंट ऑफ द ईयरचा पुरस्कार देण्यात आला. विराट कोहलीचे सध्याच्या घडीला इन्स्टाग्रामवर 23.7 कोटी युजर आहेत. त्याच्या अकाऊंटवर 709 पोस्ट अपलोड झाल्या आहेत. एवढचं नाही तर कोहली आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पैसेही कमवतो. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असून सध्या तो आयपीएलमध्ये बंगळुरू संघाचं नेतृत्व करत आहे. मात्र, विराटचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला आहे. VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात…