मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Vijay Hazare Trophy : दुखापतीनंतरही पृथ्वी शॉ मैदानात, वादळी खेळी करून इतिहास घडवला

Vijay Hazare Trophy : दुखापतीनंतरही पृथ्वी शॉ मैदानात, वादळी खेळी करून इतिहास घडवला

मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रविवारी इतिहास घडवला. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधल्या (Mumbai vs Uttar Pradesh) विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) शॉने वादळी खेळी केली.

मुंबई, 14 मार्च : मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रविवारी इतिहास घडवला. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधल्या (Mumbai vs Uttar Pradesh) विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) शॉने वादळी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात 800 रन करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी पृथ्वी शॉने विक्रमाला गवसणी घातली. त्याने या स्पर्धेत 165.40 च्या सरासरीने आणि 138.29 च्या स्ट्राईक रेटने एकूण 827 रन केले. फायनलमध्ये त्याने 39 बॉलवर 10 फोर आणि 4 सिक्स लगावून 73 रन केले. शिवम मावीने शॉला आऊट केलं.

मॅचदरम्यान दुखापत झाल्यामुळे पृथ्वी शॉ मैदानाबाहेर गेला होता. यानंतर तो पुन्हा मैदानात उतरेल का नाही, याबाबत शंका होती, पण उत्तर प्रदेशची इनिंग 313 रनवर संपल्यानंतर पृथ्वी मैदानात उतरला आणि त्याने उत्तर प्रदेशच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.

फिल्डिंग करताना दुखापत

उत्तर प्रदेशची बॅटिंग सुरू असताना पृथ्वी शॉला 24 व्या ओव्हरमध्ये स्लिपमध्ये फिल्डिंग करत असताना दुखापत झाली. माधव कौशिकने लेग स्पिनर प्रशांत सोळंकीच्या बॉलिंगवर शॉट मारला, तेव्हा बॉल पृथ्वीला लागला.

या स्पर्धेत शॉने एक नाबाद द्विशतकासह तीन शतकं आणि एक अर्धशतकही केलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या उत्तर प्रदेशने चार विकेट गमावून 312 रन केले. ओपनर माधव कौशिकने 156 बॉलमध्ये 158 रन केले, यामध्ये 15 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.

First published:

Tags: Cricket news, Mumbai, Prithvi Shaw, Sports, Uttar pradesh, Vijay hazare trophy