मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Vijay Hazare Trophy : हिमाचलने पहिल्यांदाच पटकावली ट्रॉफी, फायनलमध्ये तामिळनाडूचा पराभव

Vijay Hazare Trophy : हिमाचलने पहिल्यांदाच पटकावली ट्रॉफी, फायनलमध्ये तामिळनाडूचा पराभव

PHOTO- BCCI

PHOTO- BCCI

हिमाचल प्रदेशने पहिल्यांदाच भारताची स्थानिक वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) पटकावली आहे. हिमाचलने माजी चॅम्पियन तामिळनाडूचा (Himachal Pradesh vs Tamil Nadu) पराभव केला आहे.

  • Published by:  Shreyas

जयपूर, 26 डिसेंबर : हिमाचल प्रदेशने पहिल्यांदाच भारताची स्थानिक वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) पटकावली आहे. हिमाचलने माजी चॅम्पियन तामिळनाडूचा (Himachal Pradesh vs Tamil Nadu) पराभव केला आहे. हिमाचलला तामिळनाडूने विजयासाठी 315 रनचं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना हिमाचलने 47.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 299 रन केले होते, खराब प्रकाशामुळे अंपायरनी खेळ थांबवला आणि हिमाचलला विजेता घोषित केलं. हिमाचलचा ओपनर शुभम अरोराने 136 रनची खेळी केली, याशिवाय अमित कुमारने 79 बॉलमध्ये 74 रन केले.

या सामन्यात तामिळनाडूने पहिले बॅटिंग करत 49.4 ओव्हरमध्ये 314 रन केले होते. दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 116 रनची खेळी केली, तर बाबा इंद्रजीतने 80 रन केले, पण तामिळनाडूसाठी हिरो ठरला शाहरुख खान (Shahrukh Khan). अखेरच्या काही ओव्हरमध्ये शाहरुखने आक्रमक बॅटिंग केली. त्याने 21 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 42 रन ठोकले, यात 3 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. शाहरुखच्या या आक्रमक खेळीमुळे तामिळनाडूने हिमाचलला 314 रनचं आव्हान दिलं. हिमाचलकडून पंकज जसवालने 4 आणि ऋषी धवनने 3 विकेट घेतल्या.

हिमाचलसाठी 315 रनच्या आव्हानाचा पाठलाग करणं सोपं नव्हतं, पण शुभम अरोराने (Shubham Arora) चांगली सुरुवात करून दिली. प्रशांत चोप्रासोबत त्याने पहिल्या विकेटसाठी 60 रनची पार्टनरशीप केली, यानंतर निखील गंगताही 18 रनवर आऊट झाला. एकावेळी हिमाचलचा स्कोअर 100 रनच्या आत 3 विकेट होता, पण शुभम एका बाजूने लढत राहिला.

शुभमने अमित कुमारसोबत 148 रनची महत्त्वाची पार्टनरशीप केली. 244 रनच्या स्कोअरवर अमित 74 रन करून आऊट झाला. तरीही शुभम दुसऱ्या बाजूला उभा राहिला, त्याने 136 रनची नाबाद खेळी केली आणि हिमाचलला पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी मिळवून दिली.

First published:

Tags: Vijay hazare trophy