Vijay Hazare Trophy : 24व्या बॉलवर पहिली रन, मग ठोकले 158, कोण आहे माधव कौशिक?

Vijay Hazare Trophy : 24व्या बॉलवर पहिली रन, मग ठोकले 158, कोण आहे माधव कौशिक?

विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) मुंबईविरुद्ध उत्तर प्रदेशच्या (Mumbai vs Uttar Pradesh) माधव कौशिकने (Madhav Kaushik) शतक केलं. या शतकासोबतच त्याने 5 रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मार्च : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) मुंबईविरुद्ध उत्तर प्रदेशच्या (Mumbai vs Uttar Pradesh) माधव कौशिकने (Madhav Kaushik) शतक केलं. या शतकासोबतच त्याने 5 रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले. पहिले बॅटिंग करणाऱ्या उत्तर प्रदेशने 4 विकेट गमावून 312 रन केले. माधव कौशिक स्पर्धेच्या फायनलमध्ये 150 रनची खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

या मॅचमध्ये उत्तर प्रदेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीमची सुरूवात खूप संथ झाली. माधवने पहिल्या 23 बॉलवर एकही रन काढली नाही. 24 व्या बॉलवर एक रन काढून त्याने आपलं खातं उघडलं. 10 ओव्हरनंतर उत्तर प्रदेशचा स्कोअर 28-0 एवढा होता. यानंतर माधव आणि समर्थ सिंग यांनी जलद रन करायला सुरूवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 26 ओव्हरमध्ये 122 रनची पार्टनरशीप केली. 55 रन करून समर्थ आऊट झाला.

याआधी माधवने लिस्ट ए कारकिर्दीमध्ये 5 मॅच खेळून 85 रन केले होते आणि त्याचा सर्वाधिक स्कोअर 34 रन होता. म्हणजेच फायनलपर्यंत त्याच्या नावावर अर्धशतकही नव्हतं, तसंच त्याने फक्त 157 बॉलचा सामना केला होता. तर फायनलमध्ये तो 156 बॉल खेळला. माधवच्या या खेळीमध्ये 15 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात माधवची ही तिसरीच मॅच होती. सेमी फायनलमध्ये त्याने 15 रन तर दिल्लीविरुद्ध 16 रन केले होते.

23 वर्षांच्या माधव कौशिकने 9 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 29 च्या सरासरीने 350 रन केले, यामध्ये एक अर्धशतकही आहे. याशिवाय तीन टी-20 मॅचमध्ये त्याने 56 रन केले आहेत. उत्तर प्रदेशच्या टीमने 16 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

माधव कौशिकचे पाच रेकॉर्ड

- विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये सर्वाधिक स्कोअर

- इनिंगचा पहिला आणि शेवटचा बॉल खेळला

- टीमचे अर्ध्यापेक्षा जास्त रन केले

- 20 बॉलपर्यंत एकही रन नाही, यानंतर 150 रनपेक्षा जास्तची खेळी

- फायनलमध्ये जेवढ्या रन केल्या तेवढ्या करियरमध्येही केल्या नाहीत.

Published by: Shreyas
First published: March 14, 2021, 3:27 PM IST

ताज्या बातम्या