मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Vijay Hazare Trophy : मुंबईच किंग! फायनलमध्ये उत्तर प्रदेशला लोळवलं

Vijay Hazare Trophy : मुंबईच किंग! फायनलमध्ये उत्तर प्रदेशला लोळवलं

विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) मुंबईने उत्तर प्रदेशला (Mumbai vs Uttar Pradesh) धूळ चारली आहे. उत्तर प्रदेशने ठेवलेल्या 313 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 41.3 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून केला.

नवी दिल्ली, 14 मार्च : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy Final) मुंबईने उत्तर प्रदेशला (Mumbai vs Uttar Pradesh) धूळ चारली आहे. उत्तर प्रदेशने ठेवलेल्या 313 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 41.3 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून केला. आदित्य तरेने (Aaditya Tare) 107 बॉलमध्ये 118 रनची खेळी केली, तर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 39 बॉलमध्ये 73 रन आणि शिवम दुबेने 28 बॉलमध्ये 42 रन केले. यशस्वी जयस्वालला 29 आणि शम्स मुलानीला 36 रन करता आले. उत्तर प्रदेशकडून यश दयाळ, शिवम मावी, शिवम शर्मा आणि समीर चौधरी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये उत्तर प्रदेशने टॉस जिंकून सुरूवातीला बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी अत्यंत सावध सुरूवात केली. पहिल्या 10 ओव्हरमध्ये त्यांना फक्त 28 रन करता आल्या. उत्तर प्रदेशचा ओपनर माधव कौशिकने 24 व्या बॉलवर पहिली रन काढली, पण यानंतर त्याने 158 रनची खेळी केली. तर समर्थ सिंग आणि अक्षदीप नाथ यांनी प्रत्येकी 55 रन केले. मुंबईकडून तुषार कोटियनला 2 आणि प्रशांत सोळंकीला 1 विकेट मिळाली.

मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ या संपूर्ण मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये होता. विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात त्याने तब्बल 800 रनचा टप्पा गाठला. एका मोसमात एवढ्या रन करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याने या स्पर्धेत 165.40 च्या सरासरीने आणि 138.29 च्या स्ट्राईक रेटने एकूण 827 रन केले. या स्पर्धेत शॉने एक नाबाद द्विशतकासह तीन शतकं आणि एक अर्धशतकही केलं

मुंबईने जिंकल्या सगळ्या मॅच

विजय हजारे ट्रॉफीच्या सुरूवातीच्या काही मॅचमध्ये श्रेयस अय्यरने मुंबईचं नेतृत्व केलं, पण इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाल्यामुळे अय्यरला तिकडे जावं लागलं, त्यामुळे पृथ्वी शॉकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. या मोसमाच्या सगळ्या मॅचमध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने दिल्लीविरुद्ध 7 विकेटने, महाराष्ट्राविरुद्ध 6 विकेटने, पुदुच्चेरीविरुद्ध 233 रनने, राजस्थानविरुद्ध 67 रनने, हिमाचलविरुद्ध 200 रनने लीग स्टेजमध्ये विजय मिळवले. तर क्वार्टर फायनलल मुंबईचा सौराष्ट्रविरुद्ध 9 विकेटने, सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध 72 रनने विजय झाला.

First published:

Tags: Cricket news, Mumbai, Prithvi Shaw, Vijay hazare trophy