VIDEO : क्रिकेटची 'ही' मॅच तुम्ही कधीच पाहिली नसेल!

VIDEO : क्रिकेटची 'ही' मॅच तुम्ही कधीच पाहिली नसेल!

तुम्ही प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर अनेक क्रिकेट मॅच (Cricket Match) पाहिल्या असतील. आपल्या टीमचा विशिष्ट रंगाचा ड्रेस घालून क्रिकेटपटू त्या मॅचमध्ये खेळत असतात. पण वाराणसीमध्ये (Varanasi) एक अनोखी मॅच रंगली होती.

  • Share this:

वाराणसी, 19 फेब्रुवारी : तुम्ही प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर अनेक क्रिकेट मॅच (Cricket Match) पाहिल्या असतील. आपल्या टीमचा विशिष्ट रंगाचा ड्रेस घालून क्रिकेटपटू त्या मॅचमध्ये खेळत असतात. पण वाराणसीमध्ये (Varanasi) एक अनोखी मॅच रंगली होती. या मॅचमध्ये खेळाडू स्पोर्ट्स ड्रेसच्या ऐवजी धोतर आणि कुर्त्यामध्ये होते. या मॅचची कॉमेंट्री देखील तेथील मुख्य स्थानिक भाषा असलेली हिंदी किंवा आंतरराष्ट्रीय भाषा असलेल्या इंग्रजीमध्ये न होता संस्कृतमध्ये होत होती.

वारणसीमधल्या संपूर्णानंद विद्यापीठामध्ये ही अनोखी मॅच पार पडली. या मॅचमध्ये सहभागी झालेले खेळाडू धोतर आणि कुर्ता घालून मैदानात उतरले होते. एखादा बॉलर आपलं धोतर सांभाळून बॉलिंग करत होता. तर बॅट्समन सिक्स, फोर लावण्यासोबतच रन काढताना आपलं धोतर निसटणार नाही याचीही खबरदारी घेत होता. या अनोख्या मॅचची कॉमेंट्री देखील संस्कृत भाषेत होत होती.

अंपायरचाही खास ड्रेस

या मॅचमध्ये धीरज मिश्रा आणि अनुज तिवारी हे अंपायर होते. ते भगवं धोतर, उपरणं आणि रुद्राक्षाच्या माळा अशा खास पोशाखात उपस्थित होते. ते त्यांचे सर्व निर्णय तसंच खेळाडूंशी संभाषण देखील संस्कृतमध्ये करत होते.

(हे पाहा : ‘मी तर लहानपणापासून...’ मुंबई इंडियन्सनं निवडताच अर्जुनची भावुक प्रतिक्रिया, VIDEO )

दश्वामेधमधील श्री शास्त्रार्थ महाविद्यालयाच्या 77 व्या स्थापना दिवसानिमित्त ही खास मॅच झाली. ही मॅच पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातील प्रेक्षकांची उपस्थिती होती.

Published by: News18 Desk
First published: February 19, 2021, 2:16 PM IST

ताज्या बातम्या