IND vs ENG U19 World Cup Final Live: राज-रवीच्या आक्रमणासमोर इंग्लंडची बॅटिंग गडगडली, भारताला 190 रनचं आव्हान
IND vs ENG U19 World Cup Final Live: राज-रवीच्या आक्रमणासमोर इंग्लंडची बॅटिंग गडगडली, भारताला 190 रनचं आव्हान
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup Final) सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध (India vs England) सहाव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरली आहे.
टीम इंडियाने इतिहास घडवला, पाचव्यांदा जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप, दिनेश बानाने लागोपाठ दोन सिक्स मारत भारताला मिळवून दिला विजय
1:27 (IST)
भारताला सहावा धक्का, कौशल तांबे एक रनवर आऊट, भारताला विजयासाठी 22 बॉलमध्ये 14 रनची गरज
1:15 (IST)
भारताला पाचवा धक्का, राज बावा 35 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 164/5, विजयासाठी 39 बॉलमध्ये 22 रनची गरज
0:14 (IST)
भारताला चौथा धक्का, कर्णधार यश ढूल 17 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 28.2 ओव्हरमध्ये 97/4, विजयासाठी आणखी 93 रनची गरज
0:11 (IST)
भारताला तिसरा धक्का, शेख रशीद 50 रन करून आऊट, भारताचा स्कोअर 27 ओव्हरमध्ये 95/3, भारताला विजयासाठी आणखी 95 रनची गरज
23:35 (IST)
भारताला दुसरा धक्का, हरनूर सिंग 21 रनवर आऊट, अस्पिनवॉलला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 17.3 ओव्हरमध्ये 49/2, विजयासाठी आणखी 141 रनची गरज
22:26 (IST)
भारताला पहिला धक्का, अंगरिक्ष रघुवंशी शून्य रनवर आऊट, जोशुआ बॉयडनला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 0.2 ओव्हरमध्ये 0/1
21:55 (IST)
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा 189 रनवर ऑल आऊट, भारताचे फास्ट बॉलर चमकले, राज बावाला 5 तर रवी कुमारला 4 विकेट, स्पिनर कौशल तांबेने घेतली एक विकेट, इंग्लंडकडून जेम्स रियूने केल्या सर्वाधिक 95 रन
एण्टिग्वा, 5 फेब्रुवारी: अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup Final) सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध (India vs England) सहाव्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरली आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
यश ढूलच्या (Yash Dhull) नेतृत्वात खेळलेल्या भारताने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 96 रनने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. तर इंग्लंडने रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानचा 15 रननी पराभव केला होता. मैदानाबाहेर कोरोनासोबत संघर्ष केल्यानंतर भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला, तरीही टीम डगमगली नाही. कर्णधार यश ढूल आणि उपकर्णधार शेख रशीद कोरोनामुळे 3 पैकी 2 मॅच खेळू शकले नाहीत.
भारतीय टीम
अंगरिक्ष रघुवंशी, हरनूर सिंग, शैक रषीद, यश ढूल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगर्गेकर, दिनेश बाना, कौशल तांबे, राज बावा, विकी ओत्सवाल, रवी कुमार
इंग्लंडची टीम
जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम प्रिस्ट, जेम्स रियू, विलियम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, एलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस एस्पिनवॉल, जोशुआ बॉयडन