जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'पहिले देश, मग परिवार', या मराठमोळ्या खेळाडूचं धोनीच्या पावलावर पाऊल

'पहिले देश, मग परिवार', या मराठमोळ्या खेळाडूचं धोनीच्या पावलावर पाऊल

'पहिले देश, मग परिवार', या मराठमोळ्या खेळाडूचं धोनीच्या पावलावर पाऊल

अल्टीमेट खो-खो लीगला (Ultimate Kho Kho) दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरूवात झाली आहे. पण या स्पर्धेत भाग घेतलेल्या मराठमोळ्या मिलिंद चवरेकर (Milind Chavarekar) याचं कौतुक होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 जानेवारी : अल्टीमेट खो-खो लीगला (Ultimate Kho Kho) दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरूवात झाली आहे. पण या स्पर्धेत भाग घेतलेल्या मराठमोळ्या मिलिंद चवरेकर (Milind Chavarekar) याचं कौतुक होत आहे. या स्पर्धेचा कॅम्प सुरू झाला तेव्हा मिलिंदला मुलगा झाला, पण खेळाबद्दल प्रेम असल्यामुळे मिलिंद त्याच्या मुलाला बघू शकलेला नाहीये. मुलाची आणि कुटुंबाची आठवण येत आहे, पण पहिले देश, मग परिवार. खो-खो खेळामुळे मला नाव आणि ओळख मिळाली. असं मिलिंद म्हणाला आहे.

18 वर्षांपूर्वी मिलिंदने खो-खो खेळायला सुरूवात केली. 2016 साली गुवाहाटीमध्ये झालेल्या साऊथ एशियन टीममध्ये मिलिंद होता. तसंच भारताकडून खेळताना मिलिंदला सुवर्णपदकही मिळालं आहे. 2015 साली मिलिंदला एकलव्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. 12-15 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास 100 खेळाडूंना 10 टीममध्ये विभागण्यात आलं आहे. या टीमचे दोन पूल करण्यात आले आहेत. प्रत्येक पूलच्या टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळतील आणि दोन्ही ग्रुपच्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. 15 फेब्रुवारीला अल्टीमेट खो-खोची फायनल खेळवण्यात येणार आहे. जॅग्युआर्स, निनजास, रायनोस, चीताज, फ्रिस्की रेंजर्स, पॅन्थर्स, पहाडी बिल्लास आणि शार्क्स अशी या टीमची नावं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात