टोकयो, 29 ऑगस्ट : टोकयो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताला दुसरं मेडल मिळालं आहे. उंच उडी स्पर्धेमध्ये (High Jump) भारताच्या निशाद कुमार याला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. निशाद कुमारने (Nishad Kumar) 2.06 मीटर लांब उडी मारत, फायनलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. याच इव्हेंटमध्ये भारताचा रामपाल पाचव्या क्रमांकावर राहिला. टोकयो पॅरालिम्पिक्समधलं भारताचं हे दुसरं मेडल आहे.
Nishad Kumar wins silver in High Jump T47 at Tokyo #Paralympics pic.twitter.com/ab4bjL1l7F
— ANI (@ANI) August 29, 2021
याआधी भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल (Bhavinaben Patel) हिनं देशाला पहिलं मेडल मिळवून दिलं. पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारा निशाद कुमार तिसरा भारतीय आहे. याआधी भाविनाबेन पटेलला सिल्व्हर मेडल मिळालं. तर 2016 साली दीपा मलिकनं ही कामगिरी केली होती. तिनं गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावले होते.
Another #Silver for India on National Sports Day.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 29, 2021
Congratulations to Nishad Kumar for the stellar performance. You’ve done our country proud. #TokyoParalympics pic.twitter.com/byO6vm28KI
निशाद कुमारला सिल्व्हर मेडल मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्याचं अभिनंदन केलं आहे. तर राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) निशाद कुमारचं कौतुक केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी भारताला आणखी एक सिल्व्हर मेडल मिळालं. निशाद कुमारने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.