मुंबई, 7 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे कसोटी सामने खेळवले जात आहेत. याच दरम्यान क्रीडा विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतातील एक प्रतिष्टीत वृत्तपत्राचे वरिष्ठ क्रीडा उपसंपादक एस दिनकर यांचा मृतदेह इंदूर येथील एका हॉटेल रूममध्ये सापडला आहे. या बातमीनं क्रीडा विश्वावर शोककळा पसरली असून सर्वस्थरातून दुःख व्यक्त होत आहे.
क्रीडा पत्रकार एस दिनकर हे इंदूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी दिनकर हे इंदूरच्या विजय नगर येथील एका हॉटेलमध्ये काही काळासाठी वास्तव्यास होते. याच हॉटेल रूममध्ये दिनकर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना अशा अवस्थेत पाहून जवळच्या रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. प्ररथमदर्शनी त्यांचा मृत्यू हा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे समजत असून याबाबतची माहिती मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून मंगळवारी देण्यात आली.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीनंतर दिनकर यांचा मृत्यू हा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डीसीपी संपत उपाध्याय यांनी सांगितले की, वरिष्ठ क्रीडा पत्रकार मृत्यू प्रकरणी संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच याबाबत बोलता येईल. एस दिनकर हे इंदूर येथील सामना झाल्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामन्याचे वार्तांकन करण्यासाठी ते मंगळवारी अहमदाबादला जाण्यासाठी निघणार होते. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी दिनकर यांना श्रद्धांजली वाहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Test cricket