जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / US Open 2021: जोकोविचची फायनलमध्ये धडक, इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

US Open 2021: जोकोविचची फायनलमध्ये धडक, इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

US Open 2021: जोकोविचची फायनलमध्ये धडक, इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

जगातील नंबर वन टेनिस खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या (US Open 2021) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 11 सप्टेंबर : जगातील नंबर वन टेनिस खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविचनं (Novak  Djokovic) अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या (US Open 2021) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जोकविचनं सेमी फायनलमध्ये जर्मनीच्या अ‍ॅलेक्झँडर ज्वेरेवचा (Alexander Zverev) 4-6, 6-2, 6-2, 4-6 आणि 6-2 असा पाच सेटमध्ये पराभव केला. जोकविचचा ग्रँड स्लॅम स्पर्धेतील हा सलग 27 वा विजय आहे. या विजयानंतर आता तो कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. जोकविचनं या वर्षी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बलडन या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. 1969 साली ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेवर यांनी एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम जिंकल्या होत्या. त्यानंतर हा पराक्रम करणारा पहिला पुरुष टेनिसपटू होण्याची संधी त्याला आहे. या वर्षी झालेल्या टोकोयो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅलेक्झँडर ज्वेरेवनं जोकोविचचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला त्यानं या मॅचमध्ये घेतला आहे.

जाहिरात

जोकोविचनं यापूर्वी 2019 साली अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2020 साली त्याचा चौथ्या फेरीत पराभव झाला होता. तर मागील वर्षी चौथ्या फेरीतच जोकविचचा फटका शॉट लाईनवर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला लागला होता. त्यामुळे त्याला बाद घोषित करण्यात आले होते. विराट कोहली आणि रवी शास्त्रींना BCCI ची पर्वा नाही! हेल्थ प्रोटोकॉल मोडला? जोकोविचनं 31 व्या वेळी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सध्या जोकोविच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या तिन्ही महान टेनिसपटूंच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम आहेत. आता अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकत कॅलेंडर स्लॅमसह नदाल आणि फेडररला मागं टाकण्याची संधी जोकोविचला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात