जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / प्रेग्नंसीनंतर सानिया मिर्झानं 5 महिन्यात असं कमी केलं 22 किलो वजन, पाहा व्हिडिओ

प्रेग्नंसीनंतर सानिया मिर्झानं 5 महिन्यात असं कमी केलं 22 किलो वजन, पाहा व्हिडिओ

प्रेग्नंसीनंतर सानिया मिर्झानं 5 महिन्यात असं कमी केलं 22 किलो वजन, पाहा व्हिडिओ

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या जोरदार वर्कआउट करत असून ती लवकरच टेनिस कोर्टवर कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 09 जून : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या जोरदार वर्कआउट करत आहे. नुकताच तिच्या ट्रेनरनं तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये सानिया जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. याशिवाय सानिया सुद्धा नेहमीच्या तिच्या वर्कआउटचे फोटो शेअर करत असते. तिनं मुलाच्या जन्मानंतर अवघ्या पाच महिन्यात तब्बल 22 किलो वजन कमी केलं होतं. त्यानंतर आता ती टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.

    जाहिरात

    मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्य़ात सानियानं एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 5 महिन्यात सानियानं 22 किलो वजन कमी केलं होतं. रिपोर्ट्सनुसार सानियाला डिलिव्हरी नंतर लवकरच टेनिस कोर्टवर कमबॅक करायचं आहे. तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती टोकियो ऑलिम्पिकची तयार करत आहे. त्यामुळे आता सानियानं तिचं लक्ष फिटनेसवर केंद्रीत केलं आहे. या अभिनेत्रीला आईने मारून काढलं होतं घराबाहेर, तिने वडिलांवर लावला १२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

    प्रेग्नंसीच्या दरम्यान सानियाचं वजन जवळपास 89 किलोपर्यंत वाढलं होतं. मात्र डिलिव्हरीच्या 15 दिवसांनंतरच तिनं इंटेन्स एक्सरसाइझ करणं सुरू केलं. नियमित व्यायाम आणि हेल्दी डाएटमुळेच सानियानं 89 किलो वजन 67 किलो पर्यंत कमी केलं. स्वतःला पुन्हा एकदा परफेक्ट शेपमध्ये आणण्यासाठी आणि खेळाच्या फिटनेससाठी सानिया रोज जोरदार प्रॅक्टिस करत आहे. स्वतःच्या फिटनेससाठी सानिया रोज 4 तास व्यायाम करते. यात 100 मिनिटं कार्डियो, 1 तास किक-बॉक्सिंग आणि योगा याचा समावेश आहे. पॉकेटमनीसाठी सोनम कपूर करायची वेटरची कामं

    जाहिरात

    नुकतंच ईदच्या निमित्तानं सानियानं तिच्या मुलासोबत एक गोड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. याशिवाय सानियानं एका मासिकासाठीसुद्धा फोटोशूट केलं आहे. सानिया ज्या पद्धतीनं सध्या जिममध्ये आपल्या फिटनेससाठी मेहमत घेत आहे त्यावरुन ती लवकरच टेमिस कोर्टवर उतरेल असं म्हटलं जात आहे. सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात