मुंबई, 23 डिसेंबर : वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया 2020मध्ये पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. श्रीलंकाविरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर, दुखापतग्रस्त शिखर धवननं टीम इंडियात पुनरागमन केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका 5 जानेवारीपासून आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रोहितला टी-20मध्ये विश्रांती देण्यात आली असली तरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
Rohit Sharma and Mohammed Shami rested from next month's T20 series against Sri Lanka, Shikhar Dhawan back in both T20 and ODI squads
— Press Trust of India (@PTI_News) December 23, 2019
रोहित शर्माला विश्रांती रोहित शर्मा 2019मध्ये वर्षभर क्रिकेट खेळत आहे. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहितनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळं रोहित शर्मा 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं भारतीय संघ तयारी करत आहे. त्यामुळं निवड समिती फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनी विश्रांती देण्याचा विचार करणार नाही. मात्र रोहित शर्मा गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळं बोर्डच्या वतीनं श्रीलंका दौऱ्यात रोहितला विश्रांती दिली’. असा आहे भारत-श्रीलंका दौरा श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून गुवाहाटी येथून सुरू होईल. त्यानंतर 7 जानेवारी रोजी इंदूरमध्ये दुसरा सामना होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यात होणार आहे. बुमराहचा कमबॅक काही दिवसांआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद झाला होता. राहुल द्रविडनं बुमराहला फिटनेस टेस्ट घेण्यास नकार दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहला फ्रॅक्चर झाले होते. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह केवळ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच नाही तर बांगलादेशविरूद्धही मालिकेत खेळू शकला नाही. मात्र आता बुमराह कमबॅक करत आहे.

)







