• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup मध्ये सुंदरच्या खेळण्यावर संकट, 4 वर्षांनंतर हा खेळाडू करणार कमबॅक!

T20 World Cup मध्ये सुंदरच्या खेळण्यावर संकट, 4 वर्षांनंतर हा खेळाडू करणार कमबॅक!

भारताचा युवा ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2021) बाहेर झाला आहे. आयपीएलशिवाय सुंदरला थेट टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये (T20 World Cup) खेळवणं मुश्कील आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑगस्ट : भारताचा युवा ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) टाकलेला बॉल सुंदरच्या बोटाला लागला, यानंतर 21 वर्षांचा सुंदर एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर 15 ऑक्टोबरला आयपीएल फायनल खेळवली जाईल. यानंतर 17 ऑक्टोबरपासून लगेच टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) सुरू होईल. आयपीएलशिवाय सुंदरला थेट वर्ल्ड कप टीममध्ये खेळवणं मुश्कील आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी आर.अश्विनला (R Ashwin) संधी दिली जाऊ शकते. आर.अश्विनने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 50 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. जुलै 2017 नंतर अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेणाऱ्या स्पिनरच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 46 टी-20 मध्ये 23 च्या सरासरीने 52 विकेट घेतल्या, यात 2 वेळा 4 विकेटचा समावेश आहे. 8 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. युझवेंद्र चहल 63 विकेट घेत, पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विनला 252 मॅचचा अनुभव युएईच्या खेळपट्ट्या स्पिन बॉलिंगला मदत करतात, त्यामुळे अश्विनला टीममध्ये निवडलं जाऊ शकतं. अश्विनने आतापर्यंत 252 टी-20 मॅच खेळल्या आहेत, यात त्याला 249 विकेट मिळाल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेटही 7 पेक्षा कमी आहे. अश्विनने 79 टेस्टमध्ये 413 विकेट आणि 111 वनडेमध्ये 150 विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अश्विनने 135 मॅच खेळून 655 विकेट मिळवल्या. टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून 50 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम फक्त दोन खेळाडूंच्याच नावावर आहे. चहलने 63 आणि अश्विनने 52 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवला 41, रविंद्र जडेजाला 39 आणि युवराज सिंगला 28 विकेट मिळाल्या आहेत. ही आकडेवारी बघितली तर अश्विन टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होण्याच्या रेसमध्ये आहे, असंच म्हणावं लागेल.
  Published by:Shreyas
  First published: