• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup : टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज सुरुवात, इंग्लंडच्या बॉलर्सना चिरडलं

T20 World Cup : टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज सुरुवात, इंग्लंडच्या बॉलर्सना चिरडलं

फोटो सौजन्य : BCCI

फोटो सौजन्य : BCCI

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) धमाक्यात सुरुवात केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा (India vs England Practice Match) 7 विकेट आणि एक ओव्हर राखून विजय झाला आहे.

  • Share this:

    दुबई, 18 ऑक्टोबर : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) धमाक्यात सुरुवात केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा (India vs England Practice Match) 7 विकेट आणि एक ओव्हर राखून विजय झाला आहे. इंग्लंडने दिलेलं 189 रनचं आव्हान भारताने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं. इशान किशन (Ishan Kishan) आणि केएल राहुल (KL Rahul) या ओपनरनी भारताला 8.2 ओव्हरमध्ये 82 रनची सुरुवात करून दिली. इशान किशन 46 बॉलमध्ये 70 रन करून रिटायर्ड हर्ट झाला, तर केएल राहुलने 24 बॉलमध्ये 51 रन केले. ऋषभ पंत 14 बॉलमध्ये 29 रनवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून डेव्हिड विली, मार्क वूड आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सराव सामन्यात इंग्लंडने भारताला (India vs England Practice Match) विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या बॉलर्सना इंग्लंडला छोट्या धावसंख्येवर रोखण्यात अपयश आलं. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 188 रन केले. जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक 49 रन केले, तर मोईन अली (Moeen Ali) 43 रनवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीला (Mohammad Shami) सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मोहिमेला सुरुवात झाली  इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा (India vs England Warm Up Match) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधी भारतीय टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात आपण तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरणार असल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला खेळणार आहेत. आयपीएलआधी गोष्टी वेगळ्या होत्या, पण राहुलच्या आयपीएलमधल्या कामगिरीमुळे तो आता ओपनिंगला खेळेल, असं विराटने टॉसवेळी सांगितलं. आयपीएलच्या या मोसमात पंजाबकडून खेळताना राहुलने 600 पेक्षा जास्त रन केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा ओपनिंगला खेळणार असला तरी या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडिया विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन इंग्लंडची टीम इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सैम बिलिंग्स, जॉस बटलर, सैम करन, क्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, टेमाल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेविड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वुड

    Published by:Shreyas
    First published: