Home /News /sport /

T20 World Cup 2022 : पुन्हा India vs Pakistan महामुकाबल्याचा थरार, शोएबने टीम इंडियाला डिवचलं

T20 World Cup 2022 : पुन्हा India vs Pakistan महामुकाबल्याचा थरार, शोएबने टीम इंडियाला डिवचलं

टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T20 World Cup-2022) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या महामुकाबल्याचा थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये हा सामना रंगणार आहे. याआधी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारताला डिवचलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी : टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T20 World Cup-2022) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या महामुकाबल्याचा थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधला दोन्ही देशांचा हा पहिलाच सामना असेल. याआधी 2021 साली युएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. यानंतर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारताला डिवचलं आहे. यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तान भारताला हरवेल, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. 'आम्ही मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा भारताला हरवू. पाकिस्तान टी-20 क्रिकेटमध्ये भारतापेक्षा चांगली टीम आहे. भारतीय मीडिया आपल्याच टीमवर कारण नसताना दबाव वाढवतं. जेव्हा क्रिकेटमध्ये दोन्ही देशांचा मुकाबला होतो, तेव्हा भारताला हरवणं सामान्य आहे,' असं वक्तव्य शोएब अख्तरने केलं आहे. पाकिस्तानने मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभूत केलं. त्या सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेटने विजय झाला. टी-20 आणि वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या मॅचचा आधार घेत शोएबने यंदाही पाकिस्तान भारताचा पराभव करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. टी-20 वर्ल्ड कपला अजून 9 महिने शिल्लक आहेत, तरीही अख्तरने ही भविष्यवाणी केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अजूनही भारताचं पारडं जड आहे. या दोन्ही टीममध्ये टी-20 वर्ल्ड कपचे 6 सामने झाले, यात 5 वेळा टीम इंडियाचा विजय झाला. टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करेल. मागच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर विराटने (Virat Kohli) कॅप्टन्सी सोडली, यानंतर रोहितला ही जबाबदारी देण्यात आली. भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये टीम इंडियाला सुपर-12 मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर टीमसह ग्रुप-2 मध्ये ठेवण्यात आलं आहे. भारत सुपर-12 स्टेजमध्ये एकूण 5 मॅच खेळणार आहेत. पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध, दुसरा सामना 27 ऑक्टोबरला ग्रुप-एच्या रनर अपसोबत, तिसरा सामना 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, चौथा सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आणि पाचवा सामना 6 नोव्हेंबरला ग्रुप बीच्या विजेत्या टीमविरुद्ध होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, Shoaib akhtar, T20 world cup

    पुढील बातम्या