मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये नवा वाद, आफ्रिकेच्या डिकॉकची शेवटच्या क्षणी माघार, धक्कादायक कारण

T20 World Cup मध्ये नवा वाद, आफ्रिकेच्या डिकॉकची शेवटच्या क्षणी माघार, धक्कादायक कारण

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नवा वाद समोर आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या (West Indies vs South Africa) क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) नवा वाद समोर आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या (West Indies vs South Africa) क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे. डिकॉकने वैयक्तिक कारणाचा दाखला दिला असला, तरी या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंनी प्रत्येक सामन्याआधी गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव्हस मॅटर(Black Lives Matter) या मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आदेश दिले. क्विंटन डिकॉकने मात्र या आदेशाचं पालन करू शकत नसल्यामुळे मॅचमधून माघार घेतल्याचं सांगितलं जातंय. या कारणामुळे आता डिकॉक टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

वर्णद्वेषाच्या विरोधात प्रत्येक टीमचे खेळाडू सामन्याआधी गुडघ्यावर बसून किंवा हात वर करून किंवा हात छातीवर ठेवून मोहिमेला पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू गुडघ्यावर बसले, तर पाकिस्तानच्या खेळाडूंनीही छातीवर हात ठेवून वर्णद्वेषाचा विरोध करत असल्याचा संदेश दिला.

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सामन्यातही क्विंटन डि कॉक हा एकमेव खेळाडू होता, जो गुडघ्यावर बसला नव्हता किंवा त्याने या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी छातीवर हातही ठेवला नव्हता. यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला टीममध्ये ऐक्य नसल्याचं तसंच टीम या मोहिमेला पाठिंबा देत नसल्याचं चित्र उभं राहिल, असं वाटत होतं. दक्षिण आफ्रिकेला आधीच वर्णद्वेषाचा इतिहास आहे, त्यामुळे बोर्डाने खेळाडूंनी मॅचआधी गुडघ्यावर बसण्याचे आदेश दिले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या या आदेशानंतर क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वैयक्तिक कारण देत माघार घेतली. क्विंटन डिकॉकच्याऐवजी रीझा हेन्ड्रीक्सला दक्षिण आफ्रिकेने टीममध्ये निवडलं आहे.

क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडिजविरुद्ध 50.33 च्या सरासरीने आणि 133.63 च्या स्ट्राईक रेटने 302 रन केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये क्विंटन डिकॉक वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक रन करणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. तर रिझा हेन्ड्रीक्सने वेस्ट इंडिजविरुद्ध 6 इनिंगमध्ये 22 ची सरासरी आणि 132 च्या स्ट्राईक रेटने 132 रन केले.

दक्षिण आफ्रिकेची टीम

टेम्बा बऊमा (कर्णधार), रिझा हेन्ड्रीक्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, एडन मार्करम, हेनरिच क्लासिन, डेव्हिड मिलर, ड्वॅन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्किया, तबरेझ शम्सी

First published:

Tags: Quinton de kock, South africa, T20 world cup