दुबई, 24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी टी20 वर्ल्ड कपमधील महामुकाबला होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहली आणि बाबर आझम यांची टीम जोरदार सराव करत आहे. (Pic. AFP)
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीनं विराटचा क्लास घेतला. (PIC. AFP)
टीम इंडियानं या मॅचसाठी जोरदार अभ्यास केला. यावेळी धोनीनं विराट कोहलीला खेळातील काही टिप्स दिल्या. (PIC. AFP)
महेंद्रसिंह धोनीनं नेटमध्ये थ्रो डाऊन स्पेशालिस्टची भूमिका देखील पार पाडली. धोनीनं थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र, नुवान आणि दयानंद यांना मदत केली.
टीम इंडियानं आजवर पाकिस्तान विरुद्ध 8 टी20 मॅच खेळल्या आहेत. यापैकी 6 जिंकल्या असून एक मॅच टाय झाली आहे, तर एकच मॅच गमावली आहे. भारतानं पाकिस्तानला शेवटच्या चार टी20 मॅचमध्ये हरवलं आहे. (PIC. AP)
2007 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धोनीच्या कॅप्टनसीखालील टीम इंडियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केला होता. (फाईल फोटो: AFP)