जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सचिन तेंडुलकर आणि मुलगा अर्जुनबाबत जुळून आला अनोखा योगायोग, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

सचिन तेंडुलकर आणि मुलगा अर्जुनबाबत जुळून आला अनोखा योगायोग, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

सचिन तेंडुलकर आणि मुलगा अर्जुनबाबत जुळून आला अनोखा योगायोग, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर(Arjun Tendulkar) याने मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून ट्वेंटी-ट्वेंटी (20-20_ क्रिकेटमध्ये (Cricket) पदार्पण केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जानेवारी : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची (syed mushtaq ali trophy) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत काल  मुंबई विरुद्ध हरियाणा संघात सामना झाला. या सामन्याद्वारे भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर(Arjun Tendulkar) याने मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. यासह वरिष्ठ ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत खेळलेली सचिन आणि अर्जुन यांची पहिली भारतीय बाप-लेकांची जोडी बनली आहे. यामध्ये योगायोग म्हणजे सचिन तेंडुलकरनं मुंबईसाठी अखेरची मॅच हरियाणाविरुद्ध (Hariyana) खेळली होती आणि अर्जुननं हरियाणाविरुद्ध मुंबईच्या सीनिअर टीमकडून पदार्पण केलं. या मॅचमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) खास कामगिरी करता आली नाही. अर्जुनने या मॅचमध्ये 3 ओव्हर बॉलिंग करत 34 रन दिले. यामध्ये त्याला 1 विकेट घेण्यात यश आलं असून चैत्‍या बिश्‍नोई याला त्याने आउट केलं. या मॅचमध्ये  हरियाणाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. मुंबईला 19.3 ओव्हरमध्ये  सर्वबाद 143 धावा करता आल्या. प्रथम बॅटिंग करताना मुंबईचे सहा फलंदाज 56 धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वालनं 21 चेंडूंत 6 फोर व 1  सिक्ससह 35 रन केल्या. सर्फराज खान ( 30) व अथर्व अंकोलेकर (37) यांनी सातव्या विकेटसाठी दमदार कामगिरी करताना संघाला समाधानकारक टप्पा गाठून दिला. पण हरियाणाकडून हिमांशू राणाने नाबाद 75 धावांची रनची खेळी केली. तर शिवम चौहाननेही नाबाद 43 रनची खेळी केली. यामुळे त्यांनी 2 ओव्हर आधीच मुंबईला पराभूत करत विजय मिळवला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईचे निवड समिती अध्यक्ष सलील अंकोला (Saleel Ankola) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) 22 खेळाडूंमध्ये  निवड केली होती. यांनतर काल अखेर त्याला मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुन याआधी अंडर-19 आणि अन्य वयोगटातील स्पर्धेत मुंबईकडून खेळला आहे. अर्जुनने 2018 साली अंडर-19 स्पर्धेत इंडियाकडून पदार्पण केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 युथ टेस्ट सीरिजमध्ये त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. याचबरोबर इंडियाच्या सीनिअर टीमसाठी देखील त्याने नेट बॉलर म्हणून बॉलिंग केली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या वरिष्ठ टीममध्ये त्याला संधी मिळाल्याने तो लवकरच आयपीएलमध्ये(IPL) देखील खेळताना दिसू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात