Home /News /sport /

'शास्त्रींनी मीटिंग बोलावली, रैना रडायला लागला', अक्षर पटेलने सांगितली ड्रेसिंग रूममधली Inside Story

'शास्त्रींनी मीटिंग बोलावली, रैना रडायला लागला', अक्षर पटेलने सांगितली ड्रेसिंग रूममधली Inside Story

टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने (Axar Patel) 2014 साली ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या गंभीर वातावरणाबाबत भाष्य केलं आहे. रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) बोलावलेल्या बैठकीनंतर सुरेश रैना (Suresh Raina) रडायला लागला, असं अक्षर पटेल म्हणाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 एप्रिल : टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने (Axar Patel) 2014 साली ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या गंभीर वातावरणाबाबत भाष्य केलं आहे. 30 डिसेंबर 2014 साली मेलबर्नमध्ये झालेली भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली. या टेस्ट मॅचनंतर एमएस धोनीने (MS Dhoni) अचानक निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. मॅच सुरू असतानाच धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला होता, पण याची घोषणा मॅच संपल्यानंतर करण्यात आली. 'रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) मीटिंग बोलावली आणि धोनीच्या निर्णयाबाबत सूचित केलं. टीममधला प्रत्येक जण भावुक झाला होता. जे काही होत होतं ते हैराण करणारं होतं. मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच याची घोषणा करण्यात आली, यानंतर ड्रेसिंग रूममधलं वातावरण एकदमच बदलून गेलं, प्रत्येक जण शांत होता. रवी भाईंनी बैठक बोलावली आणि सांगितलं एक घोषणा करायची आहे, माही निवृत्ती घेत आहे,' अशी आठवण अक्षर पटेलने सांगितलं. 'ही माहिती मिळताच सुरेश रैना (Suresh Raina) रडायला लागला. माझ्या आजू-बाजूलाही प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. मी दुसऱ्याच दुनियेत होतो. नेमकं काय होतंय, हे मला कळत नाहीये,' असं अक्षर पटेल म्हणाला. क्रिकेट एँकर गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात अक्षर पटेल आला होता. 'काय बोलायचं हे मला कळत नव्हतं, मी पहिल्यांदाच माही भाईला भेटत होतो. मी काही बोलणार त्याआधीच त्याने बोलायला सुरूवात केली. बापू तू आलास आणि मला जावं लागत आहे. मी असं काय केलं, याचा विचार करून मीदेखील रडायला लागलो. यानंतर धोनीने तो फक्त मस्करी करत असल्याचं सांगितलं आणि मिठी मारली,' असं वक्तव्य अक्षर पटेलने केलं. अक्षर पटेल सध्या आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत आहे. दुसरीकडे सुरेश रैनावर आयपीएल लिलावात कोणत्याच टीमने बोली लावली नाही. रैना आता आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहे. तर एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळत आहे. आयपीएल सुरू व्हायच्या आधीच धोनीने सीएसकेची कॅप्टन्सीही अशीच अचानक सोडली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Axar patel, MS Dhoni, Ravi shastri, Suresh raina

    पुढील बातम्या