जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोहलीला धक्का, रूटनंतर फॅब 4 मधला आणखी एक खेळाडू गेला विराटच्या पुढे!

कोहलीला धक्का, रूटनंतर फॅब 4 मधला आणखी एक खेळाडू गेला विराटच्या पुढे!

कोहलीला धक्का, रूटनंतर फॅब 4 मधला आणखी एक खेळाडू गेला विराटच्या पुढे!

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया (Sri Lanka vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. स्मिथने केलेल्या शतकामुळे दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 298/5 एवढा झाला आहे. स्टीव्ह स्मिथचं (Steve Smith) टेस्ट क्रिकेटमधलं हे 28वं शतक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलंबो, 8 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया (Sri Lanka vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. स्मिथने केलेल्या शतकामुळे दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 298/5 एवढा झाला आहे. स्टीव्ह स्मिथचं (Steve Smith) टेस्ट क्रिकेटमधलं हे 28वं शतक आहे, याचसोबत तो फॅब 4 मधल्या सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. फॅब 4 मध्ये आता जो रूट (Joe Root) आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नावावर 28-28 शतकं आहेत, तर विराटच्या (Virat Kohli) नावावर 27 आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) नावावर 24 शतकं आहेत. स्मिथ 105 रनवर नाबाद खेळत आहे. फॅब 4 ची शतकं स्मिथ- 28 (87 मॅच) रूट - 28 (121 मॅच) कोहली - 27 (102 मॅच) विलियमसन - 24 (88 मॅच) 18 महिन्यांनंतर स्टीव्ह स्मिथच्या बॅटमधून हे शतक आलं आहे. या शतकासोबतच स्मिथने आणखी एक रेकॉर्ड केलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 28 शतकं करण्याऱ्या खेळाडूंमध्ये स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये दिवसाअखेरीस स्मिथ आणि ऍलेक्स कॅरी खेळपट्टीवर आहेत. स्मिथशिवाय लाबुशेननेही शतक केलं. 104 रनच्या या खेळीत लाबुशेनने 12 फोर मारल्या. स्मिथने त्याच्या नाबाद 105 रनच्या खेळीत 14 फोर मारल्या आहेत. या खेळीमुळे टेस्ट क्रिकेटमध्ये स्मिथची सरासरी 60 पेक्षा जास्तची झाली आहे. फॅब 4 मधल्या खेळाडूंमधली ही सर्वोत्तम सरासरी आहे. रूटने 50.77, कोहलीने 49.53 आणि विलियमसनने 52.63 च्या सरासरीने बॅटिंग केली आहे. सरासरीच्या बाबतीतही विराट फॅब 4 मध्ये सगळ्यात मागे आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. विराट कोहलीचं अखेरचं शतक नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या टेस्टमध्ये आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात