मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वेगाचा बादशाह जेव्हा क्रिकेट खेळतो! उसेन बोल्टचा हा VIDEO पाहिलात का?

वेगाचा बादशाह जेव्हा क्रिकेट खेळतो! उसेन बोल्टचा हा VIDEO पाहिलात का?

जगातील सर्वात वेगवान धावपटू असणारा उसेन बोल्ट (Usain Bolt) यालाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही.

जगातील सर्वात वेगवान धावपटू असणारा उसेन बोल्ट (Usain Bolt) यालाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही.

जगातील सर्वात वेगवान धावपटू असणारा उसेन बोल्ट (Usain Bolt) यालाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही.

  • Published by:  Aiman Desai

 मुंबई :12 फेब्रुवारी ,जगातील सर्वात वेगवान धावपटू असणारा उसेन बोल्ट (Usain Bolt) यालाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. ॲथलेटिक्समध्ये अनेक विक्रम खिशात टाकलेल्या उसेन बोल्टने आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बोल्टने बॅटिंग करत खेळाचा आनंद लुटला.

उसेन बोल्ट (Usain Bolt) यानं आपल्या इंस्टाग्राम(Instagram) अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला त्याने A hold vibe असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये बोल्टचा मित्र बॉलिंग करताना दिसून येत आहे. सुरुवातीला एक बॉल बचावात्मक पद्धतीनं खेळल्यानंतर दुसऱ्या बॉलवर बोल्टने शानदार कव्हर ड्राइव्ह मारला. यानंतर मी देखील फास्ट असल्याचं या व्हिडिओत बोल्ट बोलताना दिसून येत आहे . या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. एकाने हा शानदार कव्हर ड्राइव्ह असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने बोल्ट विकेट अडवण्यासाठी फास्ट असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर एकानं बोल्टला smh च्या ऐवजी प्रो क्रिकेटर(Pro Cricketer) असायला हवं होतं असं म्हटलं आहे.

उसेन बोल्ट (Usain Bolt) याने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले आहेत. ॲथलेटिक्सच्या जगतात बोल्ट खूप मोठं नाव आहे. 2017 मध्ये त्याने निवृत्ती स्वीकारली असून सध्या तो फुटबॉलचा सराव करत आहे. 2020 मध्ये बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. काही दिवसांतच त्याने कोरोनावर मात केली होती. बोल्ट हा फुटबॉलचा चाहता देखील आहे आणि त्याने निवृत्तीनंतर बुंदेसलीगच्या बरुसिया डॉर्टमंडबरोबर सराव केला. 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर रिले प्रकारात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या क्रीडा प्रकारात त्याने 8 ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकले आहेत. 2008, 2012 आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने ही पदकं जिंकली असून आजपर्यंत हा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. उसेन बोल्टने अनेकवेळा वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू क्रिस गेल याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओही शेयर केले आहेत.

First published:

Tags: Athletics, Cricket, Hobby, Sports, Usain bolt, Viral video.