
9 जानेवारीपासून आय लीगला (I league open) सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर 27 ते 31 जानेवारीदरम्यान बीडब्ल्यूएफच्या वर्ल्ड टुअरच्या (BWF World Tour) फायनल होणार आहेत.

17 ते 21 मार्चदरम्यान ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप (All England Championship) होणार आहे. त्याचबरोबर 19 ते 21 मार्चदरम्यान जागतिक अथलेटिक्सच्या इनडोअर स्पर्धा(World Athletics Indoor Championships) पार पडणार आहेत.

15 मेला The FA Cup ची फायनल रंगणार आहे. तर 29 मे रोजी UEFA Champions League ची फायनल रंगणार आहे. त्याचबरोबर 23 मे पासून 6 जून पर्यंत फ्रेंच ओपन स्पर्धा(French Open) होणार आहे.

जून महिन्यात 11 तारखेला युरो फुटबॉल कप (Euro Football) आणि कोपा अमेरिका (Copa America) या फुटबॉल स्पर्धांना सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर 28 जूनपासून विम्बल्डनला (Wimboldon) सुरुवात होणार आहे.

जुलै महिन्यात 11 तारखेला विम्बल्डन (Wimbledon), कोपा अमेरिका (Copa America) आणि युरो फुटबॉल (Euro Football) स्पर्धेची सांगता होणार आहे. तर 23 जुलै रोजी टोकियोमध्ये ऑलिम्पिकला (Tokyo Olympic) सुरुवात होऊ शकते.

8 ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकच्या सांगता होणार आहे. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत टोकियो पॅरालम्पिक (Tokyo Paralympic) रंगणार आहे. तर त्यानंतर 24 ते 29 ऑगस्टदरम्यान हैदराबाद बॅटमिंटन ओपन (Hyderabad Badminton Open) स्पर्धा रंगणार आहे. 30 ऑगस्टपासून अमेरिकन ओपन (American open) स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

15 ते 19 डिसेंबरदरम्यान 2021 च्या बीडब्ल्यूएफच्या वर्ल्ड टुअरच्या (BWF World Tour) फायनल होणार आहेत.




