मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...म्हणून मुलींसोबत PHOTO काढायला घाबरतो हा फायटर, VIDEO VIRAL

...म्हणून मुलींसोबत PHOTO काढायला घाबरतो हा फायटर, VIDEO VIRAL

सध्या टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमुळे (Tokyo Olympic) सगळीकडे खेळ (Sports) आणि खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही खेळाडूंचीच चलती आहे. वेगवेगळ्या खेळाडूंचे व्हिडिओ, फोटो शेअर केले जात आहेत.

सध्या टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमुळे (Tokyo Olympic) सगळीकडे खेळ (Sports) आणि खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही खेळाडूंचीच चलती आहे. वेगवेगळ्या खेळाडूंचे व्हिडिओ, फोटो शेअर केले जात आहेत.

सध्या टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमुळे (Tokyo Olympic) सगळीकडे खेळ (Sports) आणि खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही खेळाडूंचीच चलती आहे. वेगवेगळ्या खेळाडूंचे व्हिडिओ, फोटो शेअर केले जात आहेत.

    टोकयो, 6 ऑगस्ट : सध्या टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमुळे (Tokyo Olympic) सगळीकडे खेळ (Sports) आणि खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही खेळाडूंचीच चलती आहे. वेगवेगळ्या खेळाडूंचे व्हिडिओ, फोटो शेअर केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे दक्षिण कोरियाचा (South Korea) मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट (MMA) फायटर पार्क डे संग (Park De Sung) याचा. पार्क डे संग आपल्या उत्कृष्ट खेळामुळे आणि अनेक विक्रमांमुळे लोकप्रिय आहे. त्याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

    एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर पार्क रिंग गर्लजवळ (Ring Girl) फोटोसाठीही उभा राहण्यास तयार नसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तो तिथून पळून जात असल्याने आयोजक अक्षरशः त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहेत. तसंच रिंग गर्लही त्याला समजावताना दिसत आहे. तरीही पार्कने फोटोग्राफर्सना फोटोसाठी हवी तशी पोझ दिली नाही. पार्क दोन रिंग गर्ल्सच्या मध्ये आपले हात जोडून उभा असल्याचं यात दिसतं. एवढा शक्तिशाली फायटर मुलींपासून असा दूर पळत असल्याचं बघून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली; पण त्यामागचं कारण कळल्यावर मात्र पार्कचं कौतुक होत आहे. सोलमध्ये (Seoul) रोड एफसी 36 (Road FC 36) मध्ये झालेल्या या सामन्यात त्यानं रॉड्रिगो कॅपोरेलचा पराभव केला होता. या विजयामुळे पार्क अतिशय आनंदी होता; पण तरीही फोटो काढताना तो रिंग गर्ल्सपासून दूर पळत होता. पार्कच्या या वागण्याचं कारण अनेकांना माहीत नव्हतं. पार्कच्या या अशा वागण्याचं कारण आहे आधीच्या एका सामन्यानंतर त्याच्याकडून अनावधानाने झालेली एक चूक.

    " isDesktop="true" id="588434" >

    पार्कने 2013 ते 17 दरम्यान दक्षिण कोरियासाठी अनेक स्पर्धा खेळल्या आणि त्यात विजयही मिळवला. एक लढा मात्र त्याला आयुष्यभराची शिकवण देणारा ठरला. पार्कने रोड एफसी यंग गन्स 31 स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात त्यानं क्यूंग प्यो किमचा पराभव केला. तो सामना अतिशय चुरशीचा झाला होता. त्यामुळे यात विजय मिळवल्याने पार्क अतिशय खूष होता. सामना संपल्यानंतर फोटोग्राफर्स त्याचे फोटो काढत असताना तो उत्साहानं पोझेस देत होता. याच उत्साहाच्या भरात त्यानं एका रिंग गर्लसह फोटो काढताना तिला इतकं घट्ट धरलं, की ती तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून तिला अगदी अवघडल्यासारखं झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. यानंतरही पार्कने आणखी एका फोटोसाठी पोझ देताना दुसऱ्या एका रिंग गर्ललाही असंच घट्ट धरलं होतं. फोटो काढून झाल्यावर पार्कनं रिंग गर्ल्सना झुकून अभिवादनही केलं; मात्र त्याचे हे फोटो बघून सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली.

    " isDesktop="true" id="588434" >

    पार्कने त्या मुलीला त्रास देण्याच्या उद्देशानं असं वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या अशा आरोपांमुळे पार्क खूपच दुखावला गेला. त्यामुळे त्यानं सोलमधला सामना जिंकला तेव्हा तो रिंग गर्लना जवळही येऊ देत नव्हता. त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी तयार नव्हता, त्यांच्यापासून दूर पळून जात होता. अगदी शेवटी फोटो काढला तेव्हाही तो हात जोडून उभा होता. त्याच्या या आदबशीर वर्तनामुळे चाहतेही प्रभावित झाले आणि त्यांनी त्याचं भरभरून कौतुक करत त्याला दाद दिली.

    First published:
    top videos