मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023 च्या आधी मिनी आयपीएल! मुंबई-CSK सह 6 टीममध्ये T20 चा थरार

IPL 2023 च्या आधी मिनी आयपीएल! मुंबई-CSK सह 6 टीममध्ये T20 चा थरार

आयपीएल 2023 आधी (IPL 2023) मिनी आयपीएल खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा भारतात नाही तर दक्षिण आफ्रिकेत (South Africa T20 League) होणार आहे. आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेनेही टी-20 लीग लॉन्च केली आहे.

    मुंबई, 19 जुलै : आयपीएल 2023 आधी (IPL 2023) मिनी आयपीएल खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा भारतात नाही तर दक्षिण आफ्रिकेत (South Africa T20 League) होणार आहे. आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेनेही टी-20 लीग लॉन्च केली आहे. या स्पर्धेला मिनी आयपीएल म्हणलं जात आहे कारण या लीगमध्ये खेळणाऱ्या 6 टीमना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनीच विकत घेतलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये मालकी हक्क मिळवला आहे. या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या वेगवेगळ्या फ्रॅन्चायजींनी पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये 6 टीम विकत घेतल्या आहेत. लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमच्या मालकांनी भाग घेतला होता. आयोजकांनी अजूनपर्यंत टीम विकत घेणाऱ्यांची अधिकृत घोषणा केलेली नाही. फ्रॅन्चायजीच्या विजेत्यांची घोषणा या महिन्याच्या शेवटी होऊ शकते, पण टीमच्या मालकांना त्यांच्या यशस्वी बोलीबाबत माहिती देण्यात आली आहे, तसंच त्यांच्या आवडत्या शहरांबाबत विचारण्यात आलं आहे. आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सला केपटाऊन, चेन्नई सुपर किंग्सला जोहान्सबर्ग आणि दिल्ली कॅपिटल्सला सेंच्युरियन या शहरांची नावं दिली जातील. तर आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करणारी लखनऊ डरबन फ्रॅन्चायजीसाठी आग्रही आहे. तर सनरायजर्स हैदराबादला पोर्ट एलिझाबेथ टीममध्ये रस आहे. मुंबई-चेन्नईची सर्वाधिक बोली मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनी टीम विकत घेण्यासाठी जवळपास 250 कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक टीमला 10 वर्षांसाठी फ्रॅन्चायजी फीच्या 10 टक्के द्यावे लागणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl

    पुढील बातम्या