नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या सेकंड इनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या कार्यकाळ वाढवण्यासंबंधीच्या संविधान संशोधनाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता सौरव गांगुली आणि जय शाह त्यांच्या पदावर कायम राहतील. बीसीसीआयवर जेव्हा प्रशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा लोढा समितीने बीसीसीआयचं नवीन संविधान लिहिलं, ज्यात प्रशासकांना तीन वर्षांचा कुलिंग ऑफ पिरेड देण्यात आला. या संविधानानुसार सौरव गांगुलीला त्याचं अध्यक्षपद सोडावं लागलं असतं, कारण बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याआधी सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचाही अध्यक्ष होता. तीन वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरेडला काढून टाकण्यासाठी बीसीसीआयने संविधानामध्ये संशोधन केलं, ज्याला सुप्रीम कोर्टाकडून मान्यता मिळाली आहे. कुलिंग ऑफ पिरेडसाठीची नवीन व्यवस्था बनवण्याचा प्रस्ताव आम्ही देत आहोत. कोणताही सदस्य लागोपाठ दोन वेळा राज्य क्रीडा संघ किंवा बीसीसीआयमध्ये पदावर राहू शकतो, पण त्यानंतर त्याला कुलिंग ऑफ पिरेडचं पालन करावं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सौरव गांगुली 2019 साली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला, त्याच वर्षी त्याचा कार्यकाळ संपणार होता. 2020 साली कोरोना महामारीमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाली नाही, ज्यामुळे सौरव गांगुलीचा कार्यकाळ आणखी एक वर्ष वाढवण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.