मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सौरव गांगुली का जय शाह? 'पॉवर'फूल जागेसाठी दोघांमध्ये रंगणार सामना!

सौरव गांगुली का जय शाह? 'पॉवर'फूल जागेसाठी दोघांमध्ये रंगणार सामना!

सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे सध्या बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष तर जय शाह (Jay Shah) सचिव आहेत, पण हे दोघं लवकरच एका जागेसाठी आमने-सामने असू शकतात.

सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे सध्या बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष तर जय शाह (Jay Shah) सचिव आहेत, पण हे दोघं लवकरच एका जागेसाठी आमने-सामने असू शकतात.

सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे सध्या बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष तर जय शाह (Jay Shah) सचिव आहेत, पण हे दोघं लवकरच एका जागेसाठी आमने-सामने असू शकतात.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे सध्या बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष तर जय शाह (Jay Shah) सचिव आहेत, पण हे दोघं लवकरच एका जागेसाठी आमने-सामने असू शकतात. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्यानुसार सौरव गांगुली आणि जय शाह आयसीसी अध्यक्ष (ICC Chairman) होण्यासाठी इच्छूक आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये सरळ टक्कर होऊ शकते. आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. ग्रेग बार्कले त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी इच्छूक नसल्याचं सांगण्यात येत आहे. नियमांनुसार प्रत्येक दोन वर्षांनी आयसीसी अध्यक्ष निवडावा लागतो. आयसीसीचा अध्यक्ष जास्तीत जास्त 6 वर्ष या पदावर राहू शकतो. ही 6 वर्ष लागोपाठ किंवा ठराविक कालावधीनंतरचीही असू शकतात.

सूत्रांनी द टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष बार्कले त्यांच्या व्यावसायिक कारणांमुळे अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवू इच्छित नाहीत. बार्कले ऑकलंडमध्ये व्यावसायिक वकील आहेत आणि कंपनीमध्ये डायरेक्टरही आहेत, तसंच ते न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या कंपनींच्या बोर्डातही आहेत. बार्कले यांचे गांगुली आणि जय शाह यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. आयसीसीने मात्र बार्कले यांच्या पद सोडण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

आयसीसीचं वार्षिक संमेलन जुलै महिन्यात होणार आहे, पण बार्कले ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत अध्यक्षपदावर राहू शकतात, कारण त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कार्यभार सांभाळला होता. आयसीसीची या आठवड्यात बोर्ड बैठक होणार आहे. सौरव गांगुली आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते या बैठकीसाठी दुबईला जाणार आहेत. सौरव गांगुली आयसीसी अध्यक्षपदासाठी सर्वसंमतीचे पर्याय असू शकतात, पण जय शाह यांचं नावही शर्यतीत आहे, कारण जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.

जय शाह यांनी आयसीसी अध्यक्ष होण्यासाठी रस दाखवल्याचं सूत्रांनी टेलिग्राफला सांगितलं. 2023 वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारतात होणार आहे, त्यावेळी आयसीसी अध्यक्ष बीसीसीआयचाच असेल, असं सांगितलं जात आहे.

याआधी भारतात 2011 साली वर्ल्ड कप झाला होता, तेव्हा शरद पवार आयसीसीचे प्रमुख होते. सौरव गांगुली आयसीसी अध्यक्ष होण्यासाठी इच्छूक आहेत का नाहीत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी आपलं वय लहान आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं.

बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. कूलिंग ऑफ पिरेडमध्ये जाण्याआधी त्यांच्याकडे 3 वर्षांचा आणखी एक कार्यकाळ पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

पीसीबीची भूमिका महत्त्वाची

सौरव गांगुली यांनी जर आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायचं ठरवलं तर ते पहिले निवडणुकीसाठी गरजेचं असलेलं संख्याबळ आहे का नाही हे पाहतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या व्यक्तीला विरोध न करता अध्यक्ष होऊन द्यायची शक्यता कमी आहे.

अशी असते निवड प्रक्रिया

अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया आयसीसीचं बोर्ड ठरवतं, ही प्रक्रिया प्रत्येकवेळी सारखीच असते असं नाही. 2016 साली जेव्हा शशांक मनोहर पहिल्यांदा आयसीसी अध्यक्ष झाले तेव्हा गुप्त मतदान झालं होतं. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अध्यक्ष निवडीची वेळ आली तेव्हा ते एकमेव उमेदवार होते, त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. सध्याचे अध्यक्ष बार्कलेही सर्वसंमतीने पदावर आले.

आयसीसी बोर्डामध्ये एकूण 17 डायरेक्टर असतात, यात 12 पूर्ण सदस्य, 3 डायरेक्टर असोसिएट देशांचे प्रतिनिधी, अध्यक्ष बार्कले, आयसीसी सीईओ (ज्योफ अलार्डिस), स्वतंत्र महिला डायरेक्टर इंदिरा नुई. सीईओकडे कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मतदानाचा अधिकार असत नाही. आयसीसीच्या संविधानानुसार दोन तृतियांश बहुमत किंवा 11 मतं असणं गरजेचं असतं.

First published:

Tags: BCCI, Icc, Sourav ganguly