जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सर्फराज खानने आणखी एक शतक ठोकून सिलेक्टर्सची उडवली झोप, कोच अमोल मुझुमदारनं दिली खास रिअॅक्शन

सर्फराज खानने आणखी एक शतक ठोकून सिलेक्टर्सची उडवली झोप, कोच अमोल मुझुमदारनं दिली खास रिअॅक्शन

सर्फराज खानने आणखी एक शतक ठोकून सिलेक्टर्सची उडवली झोप, कोच अमोल मुझुमदारनं दिली खास रिअॅक्शन

रणजी सामन्यात सर्फराज खान याची बॅट तळपली आणि त्याने 125 धावांची तुफान खेळी करत शतक झळकावले. या शतकासह त्याने मुंबई संघाला अडचणीतून सोडवलेच मात्र त्यासोबतच भारतीय संघाच्या सिलेक्टेर्सची देखील झोप उडवली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 जानेवारी :  भारतीय क्रिकेट विश्वात सध्या आंतरराष्ट्रीय मालिकांसोबतच रणजी क्रिकेट सामने देखील खेळवले जात आहेत. भारतीय संघातील फलंदाजांप्रमाणेच  रणजी सामन्यातही फलंदाज जोरदार खेळी करीत असून क्रिकेट रसिकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडत आहेत.  सध्या मुंबई विरुद्ध दिल्ली संघांमध्ये रणजी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईचा विस्फोटक फलंदाज सर्फराज खान याने दमदार शतक झळकावले आहे. या खेळीसह सर्फराजने भारतीय संघाच्या सिलेक्टेर्सची झोप उडवली.

News18लोकमत
News18लोकमत

दिल्ली येथील स्टेडियमवर मुंबई विरुद्ध दिल्ली या संघांमध्ये रणजी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्ली संघाने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला दिल्ली संघाच्या भेदक गोलंदाजासमोर मुंबईच्या फलंदाजांनी हात टेकले होते. स्टार खेळाडूंनी भरलेला मुंबईचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांचा शिकार होत होता. संघ संकटात असताना सर्फराज खान याची बॅट तळपली आणि त्यांनी 125 धावांची तुफान खेळी करत शतक झळकावले. या शतकासह त्याने मुंबई संघाला अडचणीतून सोडवलेच मात्र त्यासोबतच भारतीय संघाच्या सिलेक्टेर्सची देखील झोप उडवली.

जाहिरात

भारतीय संघ येणाऱ्या काळात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत वनडे आणि टी २० मालिका खेळणार आहे. परंतु रणजी सामन्यांमध्ये कमाल करणारा फलंदाज सर्फराज खान याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. मागील अनेक काळापासून सर्फराजला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु रणजी सामन्यातील या खेळीनंतर त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. हे ही वाचा : अश्लील व्हिडीओ लीक झाल्यानंतर बाबर आझमच पाहिलं ट्विट सर्फराजच्याने तुफानी खेळी करत शतक पूर्ण केल्यानंतर मुंबई संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी सरफराज खानला टोपी दाखवत हॅट्स ऑफ केले. तसेच इतर खेळाडूंनी देखील सर्फराजसाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या आणि त्याचे अभिनंदन केले.  125 धावांची इनिंग खेळल्यानंतर सरफराज यष्टीचीत झाला. त्याने 16 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 125 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात