भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सारा इन्स्टाग्रामवर नेहमीच फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर साराचे 20 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नुकतीच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये साराच्या बेस्ट फ्रेंडने तिला लग्नामध्ये ब्राइड्समेड व्हायला सांगितलं. याचसोबत साराने तिच्या बेस्ट फ्रेंडचा फोटोही शेअर केला. (Sara Tendulkar instagram)
सारा सोशल मीडियावर सक्रीय असण्याशिवाय बराच प्रवासही करते. काहीच दिवसांपूर्वी ती थायलंडच्या कोह समुई या बेटावर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. सुट्टीवर असताना तिने आलिशान रिसॉर्ट, निळाशार समुद्र किनारा यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Sara Tendulkar instagram)
थायलंडमध्ये असताना साराने चाहत्यांना तिचा नवा लूकही दाखवला, ज्यात तिची बदललेली हेयरस्टाईल दिसली. साराच्या थायलंड ट्रीपमध्ये तिची मैत्रिण मेघना कौरही होती. मेघना आर्टिस्ट असून तिलाही साराप्रमाणेच फिरण्याची हौस आहे.
थायलंडहून परतल्यानंतर साराने मुंबईमध्ये भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आम्ही जुळे दिसत आहोत का? असा प्रश्नही साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये विचारला. भावा-बहिणींची जोडी बऱ्याच काळानंतर एकत्र आली आहे, असंही सारा म्हणाली. (Sara Tendulkar instagram)
साराने मॉडेलिंगच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. एका लोकप्रिय एपेरल ब्रॅण्डसाठी तिने मॉडेलिंग केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर तिच्या मॉडेलिंगचा पहिला व्हिडिओदेखील शेअर केला. यामध्ये बनिता संधू आणि तानिया संधूही तिच्यासोबत होत्या. (Sara Tendulkar instagram)
सारा काही दिवसांपूर्वी पारंपारिक मराठी वेषात दिसली होती. मराठमोळी साडी आणि नाकात नथ घालून सारा कुटुंबातल्या लग्नात सहभागी झाली होती. (Sara Tendulkar instagram)