मुंबई, 14 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर संजू सॅमसन याचे चाहते देशभरात आहेत. संजूला जेव्हा जेव्हा भारतासाठी खेळायची संधी मिळते तेव्हा तो आपली आक्रमक फलंदाजी करून संघाला अपेक्षित यश मिळवून देतो. अशातच संजू सॅमसनने लहानपणापासून उराशी बाळगलेल एक स्वप्न काल पूर्ण झालं. या प्रसंगाचे काही फोटो आणि व्हिडिओ संजूने आपल्या सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.
अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे. जीवनात एकदातरी रजनीकांत याना भेटण्याची इच्छा संजूला होती. अखेर संजुची ही इच्छा पूर्ण झाली जेव्हा रजनीकांत यांनी स्वतः सॅमसनला घरी बोलावले. संजू सॅमसनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सुपरस्टारसोबतचा फोटो शेअर केला असून त्याचा आनंदही व्यक्त केला आहे.
संजू सॅमसनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिले की, "सात वर्षांचा असल्यापासून मी रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे. एक दिवस मी रजनी सरांना त्यांच्या घरी जाऊन भेटेन असे अनेकदा आई-वडिलांना सांगायचो. माझे हे स्वप्न अखेर 21 वर्षांनंतर सत्यात उतरले कारण 'द थलायवाने' मला आपल्या घरी बोलावले".
View this post on Instagram
View this post on Instagram
संजू सॅमसन आयपीएलच्या 16 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. 31 मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार असून राजस्थान रॉयल्स त्यांचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी सनरायजर्स हैद्राबाद सोबत राजीव गांधी स्टेडियमवर खेळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanju samson, Superstar rajnikant