मुंबई, 7 नोव्हेंबर : भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे क्रीडा विश्वातील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र हे जोडपं विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सानिया आणि शोएब अनेक ठिकाणी एकत्र दिसतात, दोघेही एकमेकांसह मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल आहे, असं दिसत होतं; पण अचानक सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विभक्त होण्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. ‘बॉलिवूड शादी’ने या संदर्भात वृत्त दिलंय.
काय आहे प्रकरण?
सानिया मिर्झाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी तिच्या इन्स्टाग्राम फीडवरून तिचा मुलगा इझानसह एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिचा मुलगा तिच्या नाकावर प्रेमाने पप्पी घेताना दिसत होता. या फोटोसोबत तिने लिहिलं होतं, " सर्वांत कठीण काळातून मला तारणारे असे हे क्षण" तिच्या या कॅप्शनवरून नेटिझन्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ‘दोघांची जोडी खूप प्रेमळ आहे, त्यांना अल्लाहने चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये,’ असं एका युजरने म्हटलंय. तर, आणखी काही युजरनी अशाच आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.
डीएनएच्या वृत्तानुसार, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक वेगळे राहत असून मुलगा इझानला सांभाळत आहेत. दोघेही लवकरच वेगळे होऊ शकतात, अशा अफवा उडत आहेत. या मागचं खरं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी शोएबने एका टीव्ही शोमध्ये तिची फसवणूक केल्याचा तिच्या चाहत्यांचा अंदाज आहे.
विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच; आता VIDEO झाला VIRAL
30 ऑक्टोबर 2022 रोजी सानिया आणि शोएबने त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता. त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा आणखी वाढल्या. इझानच्या चौथ्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो शोएबने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण सानियाने सेलिब्रेशनची कोणतीही पोस्ट टाकली नव्हती. तिने फक्त इतरांनी पोस्ट केलेल्या स्टोरी रिशेअर केल्या होत्या. काही फोटोंमध्ये इझान मार्व्हल कॉमिक्समधील थीममध्ये स्पायडरमॅन-कस्टमाइज्ड केक कापताना दिसत होता. या वेळी इझान निळी पॅंट व पांढऱ्या टी-शर्टमध्ये सुंदर दिसत होता. दुसरीकडे, शोएब काळ्या टी-शर्ट व जीन्समध्ये दिसला. तर, सानियाने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
या पूर्वी, सानियाने आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. 'तुटलेली हृदयं कुठं जातात?' असं पोस्ट केल्यामुळे तिच्या चाहत्यांना वाटलं होतं, की ती आणि तिचा पती शोएब यांच्यात मतभेद आहेत.
वर्ल्ड कप खेळलेल्या 'या' खेळाडूवर बलात्काराचा आरोप, सिडनीत अटक; पाहा काय आहे प्रकरण?
दरम्यान, सानिया आणि शोएब यांची लव्ह स्टोरी आणि लग्न फार चर्चेचा विषय ठरलं होतं. मुख्य म्हणजे दोघांनीही लग्नबंधनात अडकण्यापूर्वी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी लग्न केलं. त्यानंतर, 30 ऑक्टोबर 2018 रोजी सानियाने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव इझान मिर्झा मलिक असं ठेवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Divorce, Sania mirza, Sports