अबुधाबी, 07 फेब्रुवारी : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला अबु धाबी ओपन 2023 च्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. अमेरिकन जोडीदार बेथानी माटेक सँडसोबत महिला दुहेरीत खेळणारी सानिया मिर्झा या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडली.
सानिया आणि बेथानी यांना पहिल्या फेरीत बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्स आणि लॉरा सिगमंड यांनी 3-6, 4-0 असं पराभूत केलं. सानियाने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली असून यानंतर ती दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत अखेरचं कोर्टवर उतरणार आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिप २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा : WPL2023 : महिला प्रीमियर लीग स्पर्धेचं शेड्युल ठरलं, मेगा लिलावाची तारीखही निश्चित
सानिया मिर्झा आणि बेथानी यांना सुरुवातीच्या सेटमध्ये दुसऱ्या गेमला सर्विस गमवावी लागली. त्यानंतर पुढच्या गेममध्ये आक्रमक खेळ केला. पण फ्लिपकेन्स आणि सिगमंड यांनी सहाव्या गेममध्ये पुन्हा वर्चस्व मिळवलं आणि सानिया-बेथानी यांच्या जोडीवर दबाव टाकला.
दुसऱ्या सेटमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. तीन-तीन ब्रेक पॉइंटनंतर दोन्ही संघ 4-4 असे बरोबरी होते, पण नवव्या गेममध्ये सानिया आणि बेथानीने सर्व्हिस गमावली. एक तासाहून अधिक काळ चालेल्या या सामन्यात दहाव्या गेममध्ये फ्लिपकेन्स आणि सिगमंड यांनी विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sania mirza, Tennis player