मुंबई, 26 फेब्रुवारी : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची तीव्रता (Russia- Ukraine) युद्धाची तीव्रता आणखी वाढली आहे. रशियन सैन्य सर्व शक्तीसह युक्रेनमध्ये घुसलं आहे. युक्रेनकडूनही त्यांना प्रतिकार केला जातोय. रशियाच्या प्रचंड लष्करी शक्तीचा सामना करणे हे युक्रेनसाठी मोठं आव्हान आहे. या युद्धात युक्रेनची सामान्य नागरिकही हातामध्ये शस्त्र घेऊन मैदानात उतरली आहे. युक्रेनचा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर विताली क्लितस्कोनं (Vitali Klitschko) त्याचा भाऊ व्लादिमीरसोबत (Wladimir) युद्धात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. गार्डियन या इंग्लंडमधील वृत्तपत्रानुसार माजी हेवीवेट चॅम्पियन वितालीनं एका खासगी वाहिनीशी बोलताना ही घोषणा केली आहे. ‘माझ्याकडे अन्य कोणताही पर्याय नाही. मला हे काम करावंच लागेल. मी लढेन.’ असे त्याने जाहीर केले. वितालीनं यावेळी सांगितलं की, ‘राजधानी किवमध्ये सध्या परिस्थिती गंभीर आहे. सध्या पोलीस आणि सैन्यासोबत काम करण्याची गरज आहे. पायाभूत सुविधा, वीज, गॅस आणि पाण्याचा पुरवठा नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. किवचे नागरिक आपलं शहर वाचवण्यासाठी सैनिकासारखं लढण्यासाठी तयार आहेत. माझा युक्रेनवर आणि माझ्या देशातील नागरिकांवर विश्वास आहे.’ Russia-Ukraine War: गॅरी कस्टर्नच्या मित्रानं सांगितला युद्धाचा Live अनुभव, म्हणाले… वितालीचा भाऊ व्लादिमीर युक्रेनच्या राखीव सैन्याचा सदस्य आहे. त्याला या महिन्याच्या सुरूवातीला यामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तो यावेळी म्हणाला की, ‘युक्रेनच्या सामान्य नागरिक खंबीर आहे. ते या कठीण परिस्थितीमध्ये देशाशी एकनिष्ठ राहतील. देशाची एकता आणि शांतता कायम राहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही सर्व लोकं रशियाला त्यांचा भाऊ मानतात. लढाई करण्याची त्यांची इच्छा नाही. युक्रेनच्या नागरिकांनी लोकशाहीची निवड केली आहे. या लोकशाहीच्या संरक्षणासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागेल.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.