मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Road Safety World Series फायनलमध्ये भारताचा सामना या टीमशी

Road Safety World Series फायनलमध्ये भारताचा सामना या टीमशी

Road Safety World Series च्या सेमी फायनलमध्ये श्रीलंका लिजेंड्सनी (Sri Lanka Legends) दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा (South Africa Legends) सहज पराभव केला आहे.

रायपूर, 19 मार्च : Road Safety World Series च्या सेमी फायनलमध्ये श्रीलंका लिजेंड्सनी (Sri Lanka Legends) दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा (South Africa Legends) सहज पराभव केला आहे. पहिले बॅटिंग करत दक्षिण आफ्रिका लिजेंड्सने 20 ओव्हरमध्ये 10 विकेट गमावून 125 रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग श्रीलंका लिजेंड्सने 17.2 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून केला. याचसोबत श्रीलंका लिजेंड्स 21 मार्चला फायनलमध्ये इंडिया लिजेंड्ससोबत (India Legends) खेळेल.

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेलं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंका लिजेंड्सची पहिली विकेट फक्त 20 रनवर पडली. शानदार फॉर्ममध्ये असलेला कर्णधार तिलकरत्ने दिलशान (Tilakratne Dilshan) 18 रन करून मखाया एनटिनीच्या (Makhaya Ntini) बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर सनथ जयसूर्याही (Sanath Jayasurya) 4 फोर मारत 18 रन करून माघारी परतला. उपुल थरंगा (Upul Tharanga) आणि चिंताका जयसिंघने (Chintaka Jayasinghe) श्रीलंकेला सोपा विजय मिळवून दिला. दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 80 रनची पार्टनरशीप केली. जयसिंघेने 25 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 47 रन केले. तरंगाने आपल्या 39 रनच्या खेळीमध्ये 5 फोर मारले.

या मॅचमध्ये श्रीलंका लिजेंड्सने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला पहिले बॅटिंगला बोलावलं. श्रीलंकेची ही रणनीती यशस्वी ठरली आणि दक्षिण आफ्रिकेला फक्त 125 रनपर्यंतच मजल मारता आली. नुवान कुलशेखराने (Nuvan Kulsekhara) 25 रन देऊन 5 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अल्बेरो पीटरसनने 27 रन केले.

First published: